Parbhani Assembly Election : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सर्वत्र उत्साहात मतदान

Maharashtra Election 2024 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील ७ मतदार संघांतील २ हजार ६४६ मतदान केंद्रावर बुधवारी (ता. २०) दुपारी तीन वाजेपर्यंत शांततेत मतदान पार पडले.
Maharashtra Election
Maharashtra ElectionAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील ७ मतदार संघांतील २ हजार ६४६ मतदान केंद्रावर बुधवारी (ता. २०) दुपारी तीन वाजेपर्यंत शांततेत मतदान पार पडले.

परभणी जिल्ह्यात सरासरी ६२.७३ टक्के, तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी ६१.१८ टक्के मतदान झाले होते. या दोन जिल्ह्यांतील एकूण १११ उमेदवाराच्या भवितव्याचा निर्णय मतदारांनी घेतला. शनिवारी (ता. २३) मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील.

परभणी जिल्ह्यातील ४ मतदार संघांमध्ये १५ लाख ५४ हजार ५४७ मतदार आहेत. बुधवारी (ता. २०) सकाळी ७ वाजल्यापासून जिल्ह्यातील १ हजार ६२३ मतदान केंद्रांवर मतदान सुरू झाले. पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ६२.७३ टक्के मतदान झाले होते. त्यात जिंतूर मतदार संघात ४९.२ टक्के, परभणी मतदार संघात ४४.९९ टक्के, गंगाखेड मतदार संघात ५१.७५ टक्के, पाथरी मतदार संघात ४८.८० टक्के मतदान झाले.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी या ४ मतदार संघामध्ये महायुती व महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, अपक्ष मिळून ५८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. जिंतूर मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेघना बोर्डीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) विजय भांबळे, वंचित बहुजन आघाडीचे सुरेश नागरे यांच्यात लढत झाली.

परभणी विधानसभा मतदार संघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार डॉ. राहुल पाटील आणि शिवसेनाचे (शिंदे गट) आनंद भरोसे यांच्या थेट लढत झाली. गंगाखेड मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे, शिवसेनाचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विशाल कदम, वंचित बहुजन आघाडीचे सीताराम घनदाट यांच्यात लढत झाली.

Maharashtra Election
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात चुरशीने मतदान

पाथरी विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार राजेश विटेकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे सईदखान, अपक्ष बाबाजानी दुर्राणी, माधवराव फड अशी लढत झाली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, हिंगोली या ३ विधानसभा मतदार संघांत एकूण ५३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एकूण ९ लाख ८४ हजार ७६४ मतदार आहेत.

बुधवारी (ता. २०) सकाळी जिल्ह्यातील १ हजार २३ मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली. पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ६१.१८ टक्के मतदान झाले होते. त्यात हिंगोली मतदार संघात ४७.९१ टक्के, कळमनुरी मतदार संघात ५०.६९ टक्के, वसमत मतदार संघात ५०.३५ टक्के मतदान झाले. हिंगोली मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे आमदार तान्हाजी मुटकुळे, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) रूपाली पाटील गोरेगावकर, अपक्ष भाऊराव पाटील गोरेगावकर, रामदास पाटील सुमठाणकर यांच्या लढत झाली.

Maharashtra Election
Maharashtra Assembly Election 2024 : पुणे जिल्ह्यात उत्साही वातावरणात मतदान

कळमनुरी मतदार संघात शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर, शिवसेनाचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) डॉ. संतोष टारफे, अपक्ष अजित मगर यांच्यात, तर वसमत मतदार संघात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (अजित पवार) आमदार चंद्रकांत नवघरे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (शरदचंद्र पवार) जयप्रकाश दांडेगावकर यांच्या थेट लढत पाहावयास मिळाली.

शेतीकामे सुरू असल्यामुळे ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर सकाळी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सात मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीसह अपक्ष बंडखोर उमेदवारांमध्ये चुरशीची लढती पाहावयास मिळाल्या. सोयाबीन, कापूस आदी शेतीमालाचे पडलेले बाजारभाव, आरक्षण, बेरोजगारी, स्थलांतर, रस्ते, वीज, पाणी आदी पायाभूत सुविधांचे मुद्दे निवडणुकीत महत्त्वाचे ठरले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com