Zero Tillage Farming : शून्य मशागत तंत्राने माती करूया समृद्ध

Agriculture Technology : मी  प्रतापकाका चिपळूणकर कोल्हापूर यांच्या विनानांगरणी तंत्रज्ञानाचा वापर मागील पाच वर्षांपासून करत आहे. सुरुवात आम्ही विनानांगरणी शून्य मशागत तंत्रांनी केली.
Agriculture
Agriculture Agrowon
Published on
Updated on

Indian Agriculture : मी  प्रतापकाका चिपळूणकर कोल्हापूर यांच्या विनानांगरणी तंत्रज्ञानाचा वापर मागील पाच वर्षांपासून करत आहे. सुरुवात आम्ही विनानांगरणी शून्य मशागत तंत्रांनी केली. या तंत्रज्ञानात मुख्यत्वे आम्ही तण व्यवस्थापन हे तणनाशकाचा वापर करून करीत होतो. परंतु मागील दोन वर्षांपासून तण निर्मूलन न करता आम्ही त्याचे व्यवस्थापन करीत आहोत. आम्ही मु. देवगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर येथील शेतकरी आहोत.

आमचे आडूळ महसूल मंडळ हे प्रामुख्याने अवर्षण प्रवण आहे. त्यामुळे आमचे पर्जन्यमान ४०० ते ४५० मिलिमीटर आहे. परंतु निसर्गातील बदलामुळे पाऊस हा लहरी पडत आहे. २०२४ च्या खरीप हंगामात चालू वर्षी आमच्याकडे जवळपास ९०० मिलिमीटरच्या आसपास पाऊस झाला. हा पाऊस सरासरीच्या जवळपास दुप्पट आहे. या पावसाचा परिणाम पारंपरिक पद्धतीने जे शेती करतात त्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे.

Agriculture
Zero Tillage Technique : शून्य मशागत तंत्रातून भात शेती प्रात्यक्षिक

जे शेतकरी खोल नांगरणी आणि आंतरमशागत जास्त करतात त्या जमिनीतून मोठ्या प्रमाणात वरच्या थरातील सुपीक माती वाहून गेली. यात शेतकऱ्यांचे दोन प्रकारे नुकसान झाले. एक म्हणजे शेतातील सुपीक माती वाहून गेली. दुसरे म्हणजे ती माती धरणे, बंधारे यात साठवून दिवसेंदिवस धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होत चाली आहे. ही आपल्यासाठी तसेच प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे यावर आत्मचिंतन करायची वेळ आली आहे.

या वर्षीच्या पावसाळ्यात माझ्या मु. देवगावमध्ये चार वेळेस १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. याचा परिणाम अनेक पिके उद्‍ध्वस्त झाली. परंतु मी माझ्या शेतात जे तण व्यवस्थापन केले आहे, त्यामुळे माझ्या शेतातील मातीचा एकही कण वाहून गेला नाही. तसेच पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने झाला. तसेच पिकाला तणाचे सहजीवन मिळाल्यामुळे पिके हे सुदृढ अवस्थेत आहेत.

Agriculture
Zero Tillage Technique : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात वाहते शून्य मशागत तंत्राचे वारे

मी ज्या शेतात मागील पाच वर्षांपासून विनानांगरणी शून्य मशागत तंत्राचा वापर सुरू केला, त्या क्षेत्रातील अंदाजे ३० गुंठे क्षेत्र हे क्षारपड होते. माझ्या ३५ वर्षांच्या अनुभवावरून त्या ठिकाणी कायम पाणी साचलेले असायचे. परंतु विनानांगरणी तंत्रज्ञानाच्या परिणामाने त्या क्षेत्रावर सरासरीच्या दुप्पट पाऊस होऊन सुद्धा पीक जोमाने आले आहे. तण व्यवस्थापनाचे असे विविध चांगले परिणाम आम्हाला आमच्या शेतात दिसत आहेत. विनानांगरणी तंत्रज्ञानाचा वापर सुरू केल्यापासून पाच वर्षांनंतर आमच्या पिकांची रासायनिक खताची भूक पूर्णपणे संपली आहे. हा दृश्य परिणाम परिसरातील अनेक शेतकरी येऊन बघत आहेत.

माझ्या विनानांगरणी तंत्रज्ञानाचा वापर करीत असलेल्या जमिनीत १०० मिलिमीटर पाऊस झाल्यावर कुठे थेंबभरही पाणी साठले नाही. कोणाला यात शंका वाटत असेल तर आपण प्रत्यक्ष माझ्या विनानांगरणी तंत्रज्ञान वापर केलेल्या तुरीच्या क्षेत्रास भेट देऊ शकता आणि वास्तव जाणून घेऊ शकता. विनानांगरणी शून्य मशागत आणि तण व्यवस्थापनात याचे दृश्य परिणाम...

जमिनीची धूप पूर्णपणे थांबली.

पाण्याचा निचरा जलद होऊ लागला.

जमिनीतील जिवाणूंचे खाद्य त्यांना मिळाल्यामुळे पिकाची वाढ जोमाने झाली.

दोन पिकांच्या ओळीमध्ये तण असल्यामुळे पिकावर येणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव कमी झाला आणि आम्ही पर्यावरणपूरक शेतीकडे मार्गक्रमण करीत आहोत.

त्यामुळे मी एक कोरडवाहू शेतकरी या नात्याने महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो, की विनानांगरणी शून्य मशागत आणि तण व्यवस्थापण याच्या माध्यमातून आपण जमिनीचा सेंद्रिय कर्ब फुकटात वाढवू आणि आपली जमीन- माती श्रीमंत करू आणि आपणही समृद्ध होऊ.

दीपक जोशी जय जवान जय किसान शेतकरी मंडळ - देवगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com