

Sangli News : शेतकऱ्यांनी दर्जेदार उत्पादित केलेल्या फळांना या फळ महोत्सवानिमित्त थेट बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. राज्यातील जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने महोत्सव सुरू झाले तर शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होईल. जिल्ह्यात पुढील वर्षी फळ महोत्सवास व्यापक स्वरूप देऊ, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.
येथील नेमीनाथनगर कल्पद्रूम क्रीडांगणावर रविवारी (ता. २३) महाशिवरात्री द्राक्षदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, बाजार समिती व अन्य संस्थांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘फळ महोत्सवाचे उद्घाटन तृप्ती धोडमिसे व व सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते झाले.
या वेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विवेक कुंभार, कृषी विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण, पणन विभागाचे विभागीय सह संचालक डॉ. सुभाष घुले, सांगली विभागाचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील, सांगली ॲग्रो इनपुट्स मॅन्युफॅक्चरर्स, इनपुड्स डीलर्स असोसिएशन आणि फळ महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होते. ‘ॲग्रोवन’ने प्रसिद्ध केलेल्या फळ महोत्सव विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते या वेळी करण्यात आले.
तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, ‘‘शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना शासनाने सुरू केली आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने या संकल्पनेस चालना मिळेल. जिल्हाभर असे फळ महोत्सव राबवण्याच्या दृष्टिने प्रयत्न झाल्यास शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री होण्यास साहाय्य होईल.’’
सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी ‘ॲग्रोवन’ने प्रकाशित केलेल्या फळ महोत्सव या विशेषांकाचे कौतुक केले. या विशेषांकामध्ये द्राक्षाचे विविध वाण, आरोग्यासाठी फळांचे महत्त्व अनन्य साधारण असून, अंश विरहित फळ व सेंद्रिय फळ या प्रदर्शनामध्ये विक्रीस आहेत.
या महोत्सवासाठी सांगली जिल्ह्यासह शेजारी जिल्ह्यातील ७५ हून अधिक शेतकरी द्राक्षाचे पंधरा वाण, बेदाणा, डाळिंब, केळी, कलिंगड, पेरू, स्ट्रॉबेरी, आंबा, चिकूसह विविध फळे विक्रीसाठी घेऊन आले. महोत्सवादरम्यान शालेय विद्यार्थ्यांपासून खुल्या गटापर्यंतच्या चित्रकला स्पर्धा आणि महिलांसाठी पाककला स्पर्धा पार पडल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.