Pusad APMC : पुसद बाजार समितीचे कर्मचारी आर्थिक विवंचनेत

APMC Employee Issue : पुसद बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना तब्बल आठ महिन्यांपासून पगारच मिळाला नसल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे.
Pusad APMC
Pusad APMCAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : पुसद बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना तब्बल आठ महिन्यांपासून पगारच मिळाला नसल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. पगाराअभावी मुलांच्या शिक्षणासह आजारपण तसेच कौटुंबिक तसेच दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या पैशाची सोय करण्याचे आव्हान या कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाले असून संयम सुटत चालेल्या या कर्मचाऱ्यांनी पाच ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे.

पुसद बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे वर्चस्व आहे. या बाजार समितीची वार्षिक उलाढाल तब्बल दोन कोटी रुपयांच्या घरात आहे. मात्र त्यानंतरही संचालक मंडळाची निष्क्रियता आणि वाढता राजकीय हस्तक्षेप या कारणामुळे येथील कर्मचाऱ्यांना पगारापासून वंचित ठेवण्याची खेळी खेळली जात असल्याचा आरोप आहे.

Pusad APMC
Pune APMC Scam : पुणे बाजार समितीमध्ये पार्किंग टेंडरमध्ये घोटाळा

बाजार समितीच्या सभापतिपदी दोन महिन्यांपूर्वी अमोल फुके यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी प्रशासकीय कामकाजात सुधारणांसाठी पुढाकार घेताच त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आल्याचेही सांगितले जाते. त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसला असून आठ महिन्यांपासून पगार नसल्याने दैनंदिन गरजांसाठी पैशाची सोय करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. मुलांचे शिक्षण, आजारपण तसेच इतर कामांसाठी पैसा लागतो.

काहींनी या गरजा भागविण्यासाठी उसनवारी केली. परंतु देणेदारांकडून पैशासाठी तगादा लावला जात असल्याने कर्मचारी हतबल झाले आहेत. भविष्य निर्वाह निधीचा भरणा देखील बाजार समिती व्यवस्थापनाकडून करण्यात आलेला नाही, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. २०२० पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ॲडव्हान्स कमिटी पुणे) यांच्या खात्यात देखील पैसे भरले गेले नाही. कर्मचारी सामूहिक विमा ग्रॅज्युटी (अमरावती) यांच्या खात्यात ही मार्च २०२४ पर्यंत भरणा करण्यात आला नाही. परिणामी कर्मचाऱ्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहेत.

Pusad APMC
Pune APMC Theft : पुणे बाजार समितीमधील चोऱ्यांमुळे शेतकरी त्रस्त

दुसरीकडे बाजार समितीवर वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांकडून देखील हा प्रश्‍न सोडविण्यासाठी कोणत्याच हालचाली सुरू नसल्याने कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. दखल न घेतल्यास पाच ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

आठ महिन्यांपासून पगार नसल्यामुळे आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. ११ जून २०२४ रोजी संजय संभाजी हामंद (वय ३९) या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. परंतु बाजार समिती प्रशासनाकडून पॉलिसीचा भरणा केला नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही भरपाई मिळणार नाही. कर्मचारी पगारावर महिन्याला सात लाखांवर खर्च होतो तर वार्षिक उत्पन्न दोन कोटी आहे. प्रशासकाळात पगार नियमित होता, मात्र संचालक मंडळाच्या काळात मिळत नाही ही खेदाची बाब आहे.
भीमराव राठोड, पर्यवेक्षक, बाजार समिती, पुसद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com