Electricity crisis : महाराष्ट्रासमोर पाण्यासह विजेचं संकट, मागणी वाढल्याने अर्धा तास ते दोन तासांचे लोडशेडिंग

maharashtra load shedding : राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे वीजेची वाढलेली मागणी वाढली आहे. परंतु अनेक प्रकल्प देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवल्याने राज्यावर भारनियमनाचे संकट ओढावले आहे.
Electricity Bill
Electricity BillAgrowon
Published on
Updated on

maharashtra Electricity Board : यंदा राज्यात माॅन्सूनच्या पावसाने ओढ दिली आहे. अनेक जिल्ह्यामध्ये आॅगस्टअखेरी सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडल्याने पाण्याची पातळी खालवली आहे. अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशाच आता राज्यावर लोडशेडिंगचे संकट घोंघावत आहे. भर पावसाळ्यात ऊन्हाचा चटका वाढल्याने करोनानंतर प्रथमच राज्यात भारनियमन करावे लागत आहे. त्यामुळे आता रोज अर्धा तास ते दोन तासांच्या लोडशेडिंगला सामोरं जावे लागणार आहे.

Electricity Bill
War Room : दुष्काळ निवारणासाठी सरकार अ‍ॅक्शन मोडवर, मंत्रालयात उभारली 'वॉर रुम'

महाराष्ट्रात पाऊसमान कमी पडल्याने पिकं माना टाकू लागली आहे. खरीपाचे पिके वाचावण्यासाठी विहिरीतील पाणी द्यावे लागत आहे. मात्र, महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्याचबरोबर अनेक प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी होऊ लागली आहे. एेन पावसाळ्यात उकाडाही वाढल्याने सध्या राज्यात सरासरी २४ हजार ३०० मेगावॅट इतकी विजेची मागणी आहे. पण राज्यात देखभाल व दुरुस्तीसाठी बंद असलेले चार वीजनिर्मिती संच बंद करण्यात आल्याने सुमारे ९०० मेगावॅटचा तुटवडा निर्माण झाला आहे.

विजेच्या मागणीच्या तुलनेत उपलब्ध विजेची तफावत वाढल्याने महावितरणकडून आपत्कालीन भारनियमन करण्यात आले आहे. विजेची मागणी जशी वाढेल त्यानुसार हा भारनियमन करण्यात येत आहे. कधी अर्धा तास, कधी एक तास तर कधी दीड तासांपर्यंत वीज कपात करण्यात येत आहे. वाढीव मागणी कमी झाली किंवा पाऊस पडल्यास आल्यास भारनियमन आपोआप बंद होईल अशी माहिती एका महावितरणच्या अधिकाऱ्यांने दिलीे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com