Elon Musk : एलॉन मस्कला आलेली महागडी प्रचिती

Elon Musk Donald Trump Connection : डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आणण्यामध्ये मस्क याने सक्रिय सहभाग घेतला. ट्रम्प यांच्या निवडणूक निधीत २८८ मिलियन डॉलर्सची देणगी दिली.
Elon Musk
Elon Musk Agrowon
Published on
Updated on

Tesla Sale Drop : ‘ओ शीट, स्टुपिड, इट इज नॉट इकॉनॉमिक्स, बट इट इज पॉलिटिक्स...!’ आजकाल न्हाणीघरात अंघोळ करताना एलॉन मस्क स्वतःशी हे जोरजोरात बडबडत असावा. ‘विजेवर चालणारी वाहने’ ही नवीन संकल्पना मांडून आणि ती प्रत्यक्षात आणून दाखविणाऱ्या एलॉन मस्कच्या कारचा ‘टेस्ला’ हा ब्रँड काही वर्षांत विद्युत वाहनाला पर्यायी शब्द बनला.

टेस्लाच्या जोरावर एलॉन मस्क जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनला आहे. पण आता पुढच्या काही महिन्यात ‘एलॉन मस्क जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होता’ असा उल्लेख करावा लागेल. त्याच्या जोडीला स्वतःच्या कंपनीला खार लावणारे उद्योग करणारा आत्मघातकी उद्योजक म्हणून देखील त्याची नोंद होऊ शकते.

डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आणण्यामध्ये मस्क याने सक्रिय सहभाग घेतला. ट्रम्प यांच्या निवडणूक निधीत २८८ मिलियन डॉलर्सची देणगी दिली. कशासाठी? तर त्याची उजवी, फॅसिस्ट राजकीय विचारधारा प्रत्यक्षात आणण्यासाठी. ट्रम्प यांच्या शपथविधीच्या वेळी त्याने दिलेला नाझी सॅल्यूट लोकांच्या नजरेतून सुटणारा नव्हताच.

Elon Musk
Agriculture AI Project Baramati: बारामतीच्या एआय शेती प्रकल्पाची इलॉन मस्क यांनी घेतली दखल!

ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर तो त्यांचा उजवा हात बनला. DOGE मंत्रालयाचा प्रमुख बनला आणि त्या पदाचा वापर करत अमेरिकेतील नोकरशाही, कल्याणकारी राज्य यावर कुऱ्हाड चालवायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर आपण अमेरिकेबाहेर देखील उजव्या फॅसिस्ट राजकीय शक्ती सत्तेवर आणू शकतो अशी स्वप्ने त्याला पडू लागली. त्यानुसार ब्रिटन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया मधील देशांतर्गत राजकारणात त्याने नाक खूपसायला सुरुवात केली.

नक्की काय घडत आहे हे कळायला लोकांना थोडा वेळ लागतो हे खरे. पण कळल्यावर लोक नुसती प्रतिक्रिया देत नाहीत तर प्रतिहल्ला देखील करू शकतात. अमेरिकेत सध्या तेच सुरू आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यावर टेस्लाचे बाजार मूल्य १५०० बिलियन डॉलर्स अशा ऐतिहासिक उंचीवर पोचले होते. ते फक्त तीन महिन्यांत अर्ध्यावर आले आहे. आणि अर्थातच एलॉन मस्क याची श्रीमंती देखील खाली आली आहे.

Elon Musk
Microfinance for Women : महिलांनो, कर्जसापळ्यात अडकू नका...

ट्रम्प यांनी पुकारलेल्या व्यापार युद्धाला इतर राष्ट्रांच्या सरकारांनीच नाही तर नागरिकांनी देखील कडवा प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे. ट्रम्प यांना धडा शिकवायचा म्हणजे एलॉन मस्कला धडा शिकवायचा असे समीकरण पसरत चालले आहे.

अमेरिकेत ट्रम्प यांच्या आशीर्वादाने सरकारी खर्चावर जी कुऱ्हाड चालवली जात आहे, त्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एलॉन मस्कला धडा शिकवण्यासाठी टेस्ला विकत न घेण्याचा विचार अमेरिकेत पसरत आहे. अमेरिकेतील काही शहरांत टेस्लाच्या शोरूम समोर हिंसक म्हणता येतील अशी निदर्शने झाली आहेत. टेस्ला आणि मस्क याला टेकू देण्यासाठी खुद्द ट्रम्प यांना पुढाकार घ्यावा लागत आहे.

ट्रम्प यांच्या आक्रमक आर्थिक धोरणांना विरोध म्हणजे मस्कला विरोध हे समीकरण अमेरिकेच्या बाहेरही रुजू लागले आहे. युरोपमध्ये टेस्ला कार्सची विक्री निम्म्यावर आली आहे. जर्मनी मध्ये तर ती ७५ टक्क्यांनी कमी झाली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये देखील हेच चित्र आहे.

नव उदारमतवादाने असे सांगितले, की ग्राहकाला चांगल्या गुणवत्तेची वस्तू दिली की त्याला वश करता येते, बाकी त्याची काही अपेक्षा नसते. पण तो ग्राहक अंतर्बाह्य माणूस असतो. तो काही मूल्ये उरी बाळगतो, त्याला राजकीय विचारधारा असतात. त्याला राष्ट्रीयत्व असते... हे तर कधीही न मिटणारे जमिनी सत्य आहे. एलॉन मस्कला त्याची प्रचिती काही शे बिलियन डॉलर्सची किंमत मोजून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com