Gram Panchayat Election : आंबेगावमधील ३० ग्रामपंचायतींचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

आंबेगाव तालुक्यातील मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ३० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागरचना तयार करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
Election
ElectionAgrowon
Published on
Updated on

घोडेगाव ः आंबेगाव तालुक्यातील मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ३० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी (Gram Panchayat Election) प्रभागरचना तयार करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केला आहे. त्यानुसार ३० जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होणार असून, एप्रिल महिन्यात अंतिम प्रभागरचना जाहीर होणार असल्याचे तहसीलदार रमा जोशी यांनी सांगितले.

Election
Gram Panchayat Election : नव्या वर्षातही ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी

जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या आंबेगाव तालुक्यातील लोणी, फलोदे, कुशिरे बुद्रुक, कोलतावडे, कानसे, गोहे बुद्रुक, तळेकरवाडी, चांडोली खुर्द, अवसरी बुद्रुक, निरगुडसर, पहाडदरा, पारगांव तर्फे अवसरी बुद्रुक, जारकरवाडी, चास, ठाकरवाडी, वाळुंजनगर, पाटण, टाव्हरेवाडी, चपटेवाडी, सुपेधर, फुलवडे, डिंभे बुद्रुक, टाकेवाडी, तांबडेमळा, पिंपरगणे, म्हाळुंगे तर्फे घोडा, मांदळेवाडी, नांदूर, बोरघर व जाधववाडी या एकंदरीत ३० ग्रामपंचायती आहेत.

Election
Sugar factory Election : अपात्र उमेदवारांना ठरविले पात्र

दरम्यान, या ३० ग्रामपंचायतींसाठी तहसीलदारांनी गावाचे नकाशे अंतिम करणे, संबंधित तलाठी, ग्रामसेवक यांन संयुक्त स्थळपाहणी करून प्रभागांच्या सीमा निश्‍चितीकरण, तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली प्रारूप प्रभागरचनेची तपासणी, प्रारूप प्रभागरचना प्रसिद्धी आणि त्यावर हरकती व सूचना मागविणे, प्राप्त हरकतींवर उपविभागीय अधिकाऱ्यांकडून सुनावणी आदी प्रक्रिया ३० जानेवारी ते ११ एप्रिलपर्यंत करण्यात येणार आहे.

त्यानंतर १७ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रभागरचना अंतिम करून निवडणूक आयोगाला सादर केली जाणार आहे. आयोगाकडून २५ एप्रिल रोजी अंतिम प्रभागरचनेला मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार रमा जोशी यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com