

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील मुदत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मंगळवारी (ता. २१) निवडणूक (APMC Election) कार्यक्रमाची घोषणा केली आहे. जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांसाठी २८ किंवा ३० एप्रिलला मतदान होणार आहे.
सहकार क्षेत्रातील निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. बाजार समितीचा कार्यकाळ संपून बराच कालावधी उलटला आहे. बाजार समितीचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता.
मात्र, पुन्हा तो स्थगित करण्यात आला. आता पुन्हा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.
गेल्या काही महिन्यात सेवा सहकारी सोसायटी, ग्रामविविध कार्यकारी सोसायटी, आदिवासी सोसायटी, गृहनिर्माण संस्था, पगारदार पतसंस्था, नागरी पतसंस्था, नागरी सहकारी बँका, अर्बन बँक, खरेदीविक्री संघ, जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्था, दुग्ध संस्था, मच्छिमार संस्था आदींच्या निवडणुका आटोपल्या आहेत.
यानंतर आता बाजार समिती निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. उमरखेड तसेच पांढरकवडा बाजार समिती वगळता उर्वरीत सर्व १५ बाजार समितीची निवडणूक मंगळवारी (ता.२१) प्राधिकरणाने जाहीर केली आहे.
या बाजार समितीत होणार निवडणुका
जिल्ह्यातील १५ कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडणुकीची रणधुमाळी होणार आहे. यात यवतमाळ, आर्णी, महागाव, पुसद, दिग्रस, दारव्हा, बाभूळगाव, राळेगाव, मारेगाव, झरीजामणी, वणी, नेर, कळंब, बोरी अरब तसेच घाटंजी या बाजार समितीत निवडणुका होऊ घातल्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.