Paddy Procurement : आदिवासी विकास महामंडळाकडून ३३ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट

Tribal Development Corporation : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळमार्फत आधारभूत किंमत योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात यंदाच्या हंगामात ३३ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
Paddy Procurement
Paddy Procurement Agrowon
Published on
Updated on

Nashik News : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळमार्फत आधारभूत किंमत योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात यंदाच्या हंगामात ३३ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार धान खरेदीला सुरुवात करण्यात आली असून शेतकऱ्यांनी एनईएमएल पोर्टलवर नजिकचे धान खरेदी केंद्र निवडून नोंदणी करावी, असे आवाहन आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचालक लीना बनसोड यांनी केले आहे.

राज्यातील आदिवासी भागातील उत्पादित धान आदिवासी विकास महामंडळ किमान आधारभूत किमतीमध्ये खरेदी केला जातो. यासाठी २०२४-२५ या वर्षासाठी केंद्र शासनाने २,३०० रुपये प्रतिक्विंटल असा दर निश्चित करण्यात आला आहे. गेल्या वर्षी २,१८३ रुपये प्रतिक्विंटल असा दर निश्‍चित करण्यात आला होता.

Paddy Procurement
Paddy Procurement : धान खरेदीचे उद्दिष्ट चार लाख क्‍विंटलने वाढले

महामंडळामार्फत राज्यातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जव्हार, नाशिक आणि जुन्नर या सहा केंद्रांमध्ये धान खरेदी केली जाणार असून यामध्ये गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. महामंडळाद्वारे होणाऱ्या या खरेदीमुळे आदिवासी बांधवांना उपजीविकेचे साधन निर्माण होणार असून त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळणार आहे.

आदिवासी बांधवांना उपजीविका वृद्धीसह स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. तसेच धान खरेदीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी यंदाच्या हंगामात महामंडळाचे अधिकारी कर्मचारी यांनी थेट बांधावर जाऊन पडताळणी केली आहे.

यामध्ये प्रादेशिक अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्र व लागवडीखालील क्षेत्र किती आहे याची पाहणी करून शेतकऱ्यांचे समुपदेशन करत ई-पीकपाहणी करण्यास शेतकऱ्यांना मदत केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com