Silk Farming : अंडीपुंज निर्मिती केंद्रामुळे रेशीम शेतीला मिळणार उभारी!

Silk Production : राज्यात विस्तारणाऱ्या रेशीम उद्योगाला अंडीपुंज निर्मितीत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी नव्या वस्त्रोद्योग धोरणात २०२८ पर्यंत किमान एक कोटी अंडीपुंज उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
Silk Farming
Silk Farming Agrowon
Published on
Updated on


Silk : राज्यात विस्तारणाऱ्या रेशीम उद्योगाला अंडीपुंज निर्मितीत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी नव्या वस्त्रोद्योग धोरणात २०२८ पर्यंत किमान एक कोटी अंडीपुंज उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर येथे अंडीपुंज निर्मिती केंद्र आकार घेते आहे.

महाराष्ट्राला लागणाऱ्या एकूण अंडीपुंजापैकी ४० ते ५० लाख अंडीपुंज इतर राज्यांतून आणावे लागतात. त्यामुळे राज्य अंडीपुंज निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने चार अंडीपुंज निर्मिती केंद्रांची निर्मिती वस्त्रोद्योग धोरणात आहे. या धोरणानुसार पहिले केंद्र छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा परिसरात २५ एकरांवर उभे राहत आहे. यासाठी लागणाऱ्या जागेचा विषय तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या दूरदृष्टीतून मार्गी लागला.

मराठवाड्याचे तत्कालीन रेशीम उपसंचालक दिलीप हाके यांनी या अंडीपुंज निर्मिती केंद्रासाठी विशेष पुढाकार घेतला होता. मार्च २०२४ पासून अंडीपुंजनिर्मिती केंद्राच्या आवश्यक इमारत उभारण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. या प्रक्षेत्रावर विविध अंतरांवर व्ही-१ जातीची तुतीची लागवड करण्यात आली आहे. तात्पुरत्या स्वरूपातील दोन कीटक संगोपनगृहात व्यावसायिक कीटक संगोपन सुरू आहे. एकावेळी ४०० अंडीपुंज निर्मितीची क्षमता आहे. गडहिंग्लज येथील अंडीपुंज निर्मिती केंद्राची क्षमता वीस लाखांवरून तीस लाख अंडीपुंज निर्मितीपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यासाठी कोल्ड स्टोअरेज आणि इमारत बांधकाम प्रस्तावित आहे. अहिल्यानगर, अमरावती येथील अंडीपुंज निर्मिती केंद्राची क्षमता २० लाख अंडीपुंज इतकी असणार आहे.
गतवर्षी राज्यातील रेशीम कोष उत्पादकांनी ७१ लाख अंडीपुंज घेतले होते. त्यामधून ४,९०३ टन रेशीम कोष उत्पादन झाले. आतापर्यंत ४३ लाख अंडीपुंज राज्यात वितरित झाले. त्यापासून सुमारे २,८०३ टन रेशीम कोष उत्पादन झाले. यामध्ये मराठवाडा विभाग ५६ टक्के, पुणे विभाग ३४ टक्के, अमरावती विभाग ८ टक्के आणि नागपूर विभाग १.३ टक्का वाटा आहे. यंदा वर्षभरात किमान ७५ लाख अंडीपुंज वितरित होणे अपेक्षित आहे.

Silk Farming
Silk Farming : आता रेशीम शेतीसाठी मिळणार ९० टक्क्यांपर्यंत कर्ज

आतापर्यंत झालेली कामे
छत्रपती संभाजीनगर येथील केंद्रावर १२ एकरांवर व्ही-१ जातीच्या तुतीची १० बाय १० फूट, ६ बाय ६ फूट, ६ बाय २ फूट व ७ बाय ७ फूट अंतरावर ट्री रूपातील बाग. एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे, एक विहीर, चार कूपनलिका, तीन सोलार पंप, तीन सोलर हायमाष्ट, संपूर्ण क्षेत्राला कुंपण, रोपवाटिकेसाठी दहा गुंठे शेडनेट हाउस, अर्धा एकरावर खुली रोपवाटिका.
 दोन कीटक संगोपन केंद्रांतून ४०० अंडीपुंज बॅच एकावेळी घेण्यास सुरुवात.

अंडीपुंज निर्मिती केंद्रातील सुविधा  
 प्रशासकीय इमारत, कोल्ड स्टोअरेज, कर्मचारी निवास.
 चॉकी संगोपन केंद्र, कीटक संगोपन केंद्र.
 शेतकरी निवासी प्रशिक्षण केंद्र.

राज्यातील रेशीम उद्योग
 क्षेत्र २१,०२९ एकर
 शेतकरी १,९५२८
 अंडीपुंज वाटप ४३ लाख १४ हजार
 कोष उत्पादन २,८८६ टन
 सूत उत्पादन ४४४ टन
 रोजगार निर्मिती (लक्ष मनुष्य दिवस) ४८.८४

अंडीपुंज निर्मिती केंद्राचा फायदा
अंडीपुंजाबाबत स्वयंपूर्ण होण्यास मदत. मागणीच्या तुलनेत मराठवाड्यात ६१ टक्के अंडीपुंजाची गरज. चॉकी रेअरिंगमुळे कोश उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ. सीड रेअरिंगमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पादन. मागणीनुसार वेळेत अंडीपुंज पुरवठा. बायव्होलटाइन कोषाला प्रोत्साहन. अंडीपुंज प्रतीमध्ये होणारा बदल कमी करून उत्पादन वाढविणे शक्य. अंडीपुंज निर्मितीमुळे रेशीम शेतीउद्योगास चालना.

महाराष्ट्राला अंडीपुंज निर्मितीबाबत २०२८ पर्यंत स्वयंपूर्ण करण्याचा उद्देश आहे. छत्रपती संभाजीनगरमधील केंद्र डिसेंबर २०२५ पर्यंत कार्यान्वित होईल.
- महेंद्र ढवळे, उपसंचालक (रेशीम), मराठवाडा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com