Silk Farming : आता रेशीम शेतीसाठी मिळणार ९० टक्क्यांपर्यंत कर्ज

Team Agrowon

गेल्या काही वर्षांपासून रेशीम कोषाला सोन्याचे दिवस आले आहे. रेशीम कोषाला वाढलेल्या दरामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी तुती लागवडीकडे वळत आहे.

Silk Farming | Agrowon

पण रेशीम उद्योग उभा करण्यासाठी आर्थिक भांडवल उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकरी हा उद्योग करण्याचे टाळतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जाचा पर्याय उपलब्ध होण्यासाठी रेशीम कार्यालयाने ‘नाबार्ड’कडे पाठपुरावा केला होता.

Silk Farming | Agrowon

पाठपुराव्याची दखल घेत नाबार्डने प्रकल्प अहवाल तयार करून कर्जाचे माहिती पुस्तिकेत समावेश करून ती माहिती पुस्तिका राज्यातील सर्व बँकांना वितरित करून रेशीम उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Silk Farming | Agrowon

या उद्योगासाठी तुती लागवड, संगोपनगृह, साहित्य यासाठी सुरुवातीला मोठी रक्कम खर्च करावी लागते. परंतु शेतकऱ्यांना सुरुवातीची रक्कम खर्च करणे शक्य नसल्यास वेळेत उत्पन्न मिळण्यास अडचणी येत होत्या.

Silk Farming | Agrowon

रेशीम विभागाने घेतलेल्या पुढाकारामुळे तुती लागवड, संगोपनगृह, साहित्यासाठी कर्जपुरवठा होण्यासाठी नाबार्डने प्रकल्प अहवाल केला आहे.

Silk Farming | Agrowon

थकबाकीदार नसलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रकल्प खर्चाच्या ९० टक्के कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Silk Farming | Agrowon

साधारणपणे तुती लागवडीसाठी एकरी ६० हजार, तसेच कीटक संगोपन गृहासाठी साधारणपणे चार लाख रुपये, साहित्यासाठी ६७ हजार ५०० रुपयांचे कर्ज मिळू शकते.

Silk Farming | Agrowon

यामुळे पात्र शेतकऱ्याला पण प्रकल्प अहवाला अभावी बँका कर्ज देण्यास असमर्थता दाखवायच्या पण ती अडचण आता राहणार नाही.

Silk Farming | Agrowon

Stubble Burning : शेतातील काडीकचरा, पिकांचे अवशेष जाळाल तर दंड भराल

आणखी पाहा...