Pomegranate Production : डाळिंबाच्या क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करणार

गेल्या काही वर्षांपासून प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे आणि रोग-कीड प्रादुर्भावामुळे डाळिंब लागवड कमी होत आहे.
Pomegranate
PomegranateAgrowon

Solapur News : गेल्या काही वर्षांपासून प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे आणि रोग-कीड प्रादुर्भावामुळे डाळिंब लागवड (Pomegranate Cultivation) कमी होत आहे. परंतु यापुढे डाळिंब उत्पादकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि कमी झालेले क्षेत्र वाढविण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, विविध उपक्रम राबवू, अशी ग्वाही राज्याचे सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी दिली.

डाळिंब पिकाची लागवड वाढण्यासाठी महाराष्ट्र अॅग्रीबिझिनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाच्या क्षमता विकास घटकांतर्गत आयोजित डाळिंब पीक धोरण कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून श्री. अनुपकुमार बोलत होते.

Pomegranate
Market Bulletin : दोन वर्षांनंतर अमेरिकेत आंबा, डाळींब निर्यात होणार

शिवछत्रपती रंगभवन सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमास मॅग्नेट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक दीपक शिंदे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव, विभागीय प्रकल्प उपसंचालक राजेंद्र महाजन, नितीन पाटील, किरण गायकवाड उपस्थित होते.

आशियायी विकास बँक अर्थसाह्यित मॅग्नेट प्रकल्प व फार्म डीएसएस अॅग्रोटेक प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शिंदे यांनी केले. यावेळी डाळिंबावरील माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

तज्ज्ञांकडून तांत्रिक मार्गदर्शन

या कार्यशाळेत राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूरचे संचालक राजीव मराठे यांनी डाळिंब लागवडीचे क्षेत्र कमी झाल्याची कारणे व लागवडीचे क्षेत्र वाढण्यासाठी काय प्रयत्न करणे आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन केले. तांत्रिक मार्गदर्शनामध्ये बी. टी. गोरे यांनी उत्तम कृषी पद्धती वापरून डाळिंबाची शेती आधुनिक कशी करता येईल, यासंदर्भात मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूरच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. जोत्स्ना शर्मा यांनी डाळिंब पीक संरक्षण, डाळिंबावरील विविध रोग व त्यावरील उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नीलेश गायकवाड यांनी काढणीपश्‍चात व्यवस्थापन व डाळिंबाचे मूल्यवर्धन करण्यासाठी फळ प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com