Indian Economy : देशाची अर्थव्यवस्था ३५ ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढविण्याचे प्रयत्न

Piyush Goyal : देशपातळीवरही केंद्र सरकार निर्यातीसाठी प्रोत्साहन देत असून, २०२२-२३ या आर्थिक वर्षात देशाने ६० लाख कोटींची निर्यात केली आहे.
Piyush Goyal
Piyush GoyalAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘शहरातून वाहनांपासून ते भेळीपर्यंत विविध उत्पादनांची निर्यात होत आहे, ही गौरवाची बाब आहे. उद्योग व्यवसायातून होणारी निर्यात आणि त्यातून मिळणारे परकीय चलन ही देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारी आहे. देशपातळीवरही केंद्र सरकार निर्यातीसाठी प्रोत्साहन देत असून, २०२२-२३ या आर्थिक वर्षात देशाने ६० लाख कोटींची निर्यात केली आहे.

या निर्यातीमुळे एकेकाळी मरणासन्न असणारी अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी (ता.२५) केले. दि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कार वितरण कार्यक्रमात मंत्री गोयल बोलत होते.

Piyush Goyal
Indian Economy : एक ट्रिलि‍यन डॉलर्स भागीदारीचे लक्ष्य कसे गाठणार?

या वेळी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. एस. के. जैन, लायन्स क्लबचे जिल्हा गव्हर्नर विजय भंडारी, चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, सचिव रायकुमार नहार, संचालक अजित बोरा, माजी अध्यक्ष प्रवीण चोरबोले आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

Piyush Goyal
Indian Economy : अर्थव्यवस्था कधी येणार रुळावर?

मंत्री गोयल म्हणाले, ‘‘२०१४ पूर्वी देशाची अर्थव्यवस्था मरणासन्न असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उद्योग आणि व्यापाऱ्यांना उत्पादन आणि निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्यात आले. यासाठी विविध पायाभूत सुविधा देण्यात आल्या. यामुळे आगामी काही वर्षात भारताची अर्थव्यवस्था ३५ ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढविण्याचे प्रयत्न आहेत. यामध्ये व्यापारी आणि उद्योजकांचे मोठे योगदान आहे.’’

या वेळी मंत्री गोयल यांच्या हस्ते व्यापार महर्षी स्व. उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतिनिमित्त ‘आदर्श व्यापारी ‘उत्तम’ पुरस्कार’ सांगलीचे अरुण दांडेकर, पुणे जिल्हास्तरावरील पुरस्कार कल्याण भेळचे रमेश कोंढरे, पुणे शहरस्तरावरील पुरस्कार पुरुषोत्तम लोहिया, मर्चंटस् चेंबर सभासदांमधून देण्यात येणारा पुरस्कार जयराज आणि कंपनी फर्मचे राजेश शहा, तर चेंबरच्या सभासदांमधून प्रथमच देण्यात येणारा युवा व्यापारी पुरस्कार न्यू सच्चा सौदा पेढीचे संचालक शुभम गोयल यांना आणि पत्रकार पुरस्कार दै. सकाळचे प्रवीण डोके यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी केले, तर स्वागत राजकुमार नहार यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com