Jalgaon Doodh Sangh : दूध संघाला सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न ः चव्हाण

Cooperative Milk Dairy : जळगाव जिल्हा दूध संघात सत्तेवर असलेल्या मागील एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधाऱ्यांनी तब्बल नऊ कोटी ६० लाख रुपयांचा तोटा केला होता.
Jalgaon Doodh Sangh
Jalgaon Doodh SanghAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : जळगाव जिल्हा दूध संघात सत्तेवर असलेल्या मागील एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधाऱ्यांनी तब्बल नऊ कोटी ६० लाख रुपयांचा तोटा केला होता. तो भरून काढण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.

या वर्षी चार कोटी २४ लाख रुपये नफा मिळवून सहा कोटी ७२ लाखापर्यंत नफा कमी करण्यात आम्हाला यश आले आहे. येत्या वर्षभरात दूध संघाला सुस्थितीत आणले जाईल, असा विश्‍वास संघाचे अध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

संचालक रोहित निकम, कार्यकारी संचालक शैलेश मोरखेडे आदी उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, की संघाच्या अध्यक्षपदाची धुरा आपण १८ डिसेंबर २०२२ ला हाती घेतली. या वेळी गेल्या सत्ताधाऱ्यांनी तब्बल नऊ कोटी ६० लाख रुपयांचा तोटा केला होता. आपण अनावश्‍यक खर्चाला कात्री लावून व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी ठोस पावले उचलून हा तोटा सहा कोटी ७२ लाखांपर्यंत आणला आहे.

Jalgaon Doodh Sangh
Baramati Doodh Sangh : बारामती दूध संघ शेतकरी, कामगार हितासाठी कटिबद्ध

उत्पादकांना राज्यापेक्षा जादा दर

जिल्ह्यात दूध उत्पादकांना संघातर्फे राज्यातील संस्थापेक्षा जादा ३० रुपये ६० पैसे दर देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्यभरात दूध वाढल्यामुळे परिस्थिती गंभीर आहे. मात्र राज्यातील इतर दूध संघ यापेक्षाही कमी दर देत आहेत. दूध उत्पादकांना चांगला भाव देण्यात आपण राज्यात पहिल्या तीन क्रमांकात आहोत,

तोट्यामुळे भावात फरक नाही

दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या भावफरकाबाबत ते म्हणाले, की भाव फरक आपण ज्याला बोनस म्हणतो तो का दिला गेला नाही, याबाबतदेखील मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. भाव फरक उत्पादकांना १ एप्रिल ते ३१ मार्च २०२३ या कालावधीतील आर्थिक वर्षात देण्यात येतो.

Jalgaon Doodh Sangh
Warna Doodh Sangh : वारणा दूध संघाला स्थानिक संस्था ऑनलाइनद्वारे जोडणार

या आर्थिक वर्षात शेवटचे तीन महिने बारा दिवस वगळल्यास इतर वर्षभराचा कारभार हा मागील संचालक मंडळाने पाहिला आहे. मागील आर्थिक वर्षात संघास मोठा तोटा झाल्याने दूध उत्पादकांना दूध भाव फरक देणे शक्य नाही. मात्र इतर दुग्ध व्यावसायिक व खासगी डेअरीच्या स्पर्धेत किमान एक ते दीड रुपया प्रतिलिटर जास्त अदा केलेले आहेत.

शासनाने दूध उत्पाकाना अनुदान द्यावे

शासनाने दूध उत्पादकांना अनुदान द्यावे, अशी मागणी आपण शासनाकडे करणार आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले, की आपण याबाबत मंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. शासनाने दूध उत्पादकांना प्रतिलिटरमागे दोन रुपये अनुदान द्यावे, अशी आपण मागणी करणार आहोत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com