Baramati Doodh Sangh : बारामती दूध संघ शेतकरी, कामगार हितासाठी कटिबद्ध

Milk Rate : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाने दिलेल्या बोनसमुळे दूध उत्पादक शेतकरी, कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व समाधानाची झाली आहे.
Milk Rate
Milk RateAgrowon
Published on
Updated on

Baramati News : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाने दिलेल्या बोनसमुळे दूध उत्पादक शेतकरी, कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व समाधानाची झाली आहे. शेतकरी व कामगार हितासाठी संघ कटिबद्ध असल्याचे मत संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे व उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.

बारामती दूध संघाचे कामकाज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालते, असे सांगून अध्यक्ष गावडे म्हणाले, की तालुका दूध संघाचे दररोज सुमारे २ लाख ७० हजार लिटर दूध संकलन होत आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला सरासरी प्रतीलिटर ३४ रुपये ५३ पैसे एवढा उच्चांकी दर दिला आहे.

Milk Rate
Solapur Doodh Sangh : दूध, पशूखाद्य, भुकटीनिर्मितीसाठी 'अमूल'शी करार करणार

तसेच २०२२-२३ या वर्षात पुरवलेल्या दुधासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीलिटर ४० पैशांप्रमाणे दूध फरकापोटी ३ कोटी ५१ लाख व प्राथमिक दूध संस्थांना प्रतिलिटर १० पैसे याप्रमाणे ४८ लाख ६२ हजार रुपये देण्यात आले आहेत. संघाच्या कायम कर्मचाऱ्यांना तीन पगार म्हणजे २५ टक्के बोनसद्वारे एकूण १ कोटी ५७ लाख देण्यात आले आहेत.

संघामार्फत सर्व प्राथमिक दूध संस्थांना पशुवैद्यकीय सेवा-सुविधा, आयुर्वेदिक उपचार पद्धत, प्रशिक्षण, मुरघास प्रशिक्षण दिले जाते. तसेच दूध उत्पादकांना डेअरी साहित्य विभागामार्फत चाफकटर, मिल्किंग मशिन, मुरघास बॅग व मका बियाणे इत्यादींची अनुदानावर (स्वस्त दरात) विक्री केली जाते. संघाचे पॅकिंग दूध ‘नंदन’ ब्रँडने विविध शहरांमध्ये विक्री होत आहे.

हे दूध पुणे, नाशिक, शिर्डी, मालेगाव, मुंबई, रोहा, महाड, छ. संभाजीनगर, लातूर, सोलापूर या विविध शहरांमध्ये विक्री होत आहे. विविध नामांकित कंपन्यांना, त्यामध्ये मदर डेअरी दिल्ली, कॉफी डे, ताज हॉटेल, ग्रँड हयात हॉटेल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, हिंदुजा हॉस्पिटल, बीच कॅन्डी हॉस्पिटल, मंत्रालय, कोकण भवन इत्यादी ठिकाणी संघाच्या नंदन दुधाची विक्री होत आहे, अशी माहिती गावडे यांनी या वेळी दिली.

Milk Rate
Katraj Doodh Sangh : कात्रज दूध संघाकडून चारा, मध उत्पादनास चालना

दरम्यान, नंदन सुप्रीम, नंदन गोल्ड, नंदन गोल्ड प्लस, नंदन सिलव्हर, नंदन काफस्टार्टर, नंदन गर्भसत्त्व इत्यादी पशुखाद्य तसेच नंदन मिल्कमीन, नंदन समृद्धी (फिड सप्लिमेंट) इत्यादी प्रकारची दर्जेदार उत्पादने विक्रीसाठी बाजारात आणली आहेत.

बारामती तालुक्यासह, दौंड, पुरंदर, फलटण, इंदापूर, करमाळा, टेंभुर्णी, सोलापूर इत्यादी ठिकाणी विक्री केली जाते. उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिवाळीनिमित्ताने १६ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत नंदन पशुखाद्याच्या प्रत्येक पोत्यात ७५ ग्रॅमचा एक मोती साबण मोफत देत आहे, अशी माहिती संघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सचिन ढोपे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com