Farmer Development : भेदभाव न करता चौफेर विकास साधण्याचा प्रयत्न

Gulabrao Patil : कोणताही भेदभाव न बाळगता चौफेर विकास साधण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळेच कार्यकर्ते आणि जनता माझ्या सोबत आहे.
Gulabrao Patil
Gulabrao Patil Agrowon

Jalgaon News : आपल्या आजवरच्या कारकिर्दीत मी नेहमीच शेतकरी व जनतेच्या हिताचा विचार करून त्यांच्यासाठी झटत आहे. कोणताही भेदभाव न बाळगता चौफेर विकास साधण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळेच कार्यकर्ते आणि जनता माझ्या सोबत आहे.

मतदारसंघातील शेतीचे व वर्दळीच्या वाहतुकीचे रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण आणि कॉंक्रिटीकरणाला आपण प्राधान्य दिले असून उर्वरित स्मशानभूमी बांधकाम व स्मशानभूमी पोहोच रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

Gulabrao Patil
Agriculture Commodity Market : सोयाबीन, हरभरा उतरले; हळद तेजीत

ते अवचित हनुमान मंदिर सभागृहात तालुक्यातील, नांद्रा, आवार, तुरखेडा, धामणगाव आणि विदगाव या गावांमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपुजन केल्यानंतर आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. रिधुर येथे कानळदा ते रिधूर् रस्ता डांबरीकरण, अंगणवाडी व सभागृह, काँक्रीटीकरण, पाणीपुरवठा योजना,

Gulabrao Patil
Agriculture Land Acquisition : दूरदृष्टीचा अभाव

अवचित हनुमान मंदिर परिसरात भक्तनिवास काँक्रिटीकरण, संरक्षण भिंत वपेव्हिंग ब्लॉक बसवणे, नांद्रा येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ममुराबाद ते नाद्रा रस्त्याचे डांबरीकरण, नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम आदी कामांचे भुमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, तालुका प्रमुख शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, पंचायत समिती माजी सभापती ललीताताई पाटील - कोळी , जनाआप्पा कोळी, सर्व सरपंच - उपसरपंच -राजेंद्र कोळी, मुरलीधर कोळी, चुडामण कोळी, भगवान कुंभार, नारायण पाटील, गोकुळ कोळी आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन जनाआप्पा कोळी यांनी केले. आभार शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख राजेंद्र चुव्हाण यांनी मानले

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com