
Solpaur News : केंद्रीय जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात जलसंधारणाचे विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी अत्यंत कृतिशील आराखडा तयार करावा. प्रत्येक ठिकाणी जलसंधारणाची अत्यंत दर्जेदार कामे करून सोलापूर जिल्हा जलयुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय जलशक्ती अभियानाचे नोडल अधिकारी राकेश कुमार मीना यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलशक्ती अभियानाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत श्री. मीना मार्गदर्शन करत होते. या वेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, जिल्हा परिषद जलसंधारण अधिकारी पारसे. एस. एस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. नाईकवाडी, सोलापूर महानगर पालिकेचे डंके, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती रूपाली भावसार यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. मीना म्हणाले, जलशक्ती अभियानाअंतर्गत सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागांत झालेल्या कामांची पाहणी केली, ही सर्व कामे अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेली असून याच पद्धतीने जनशक्ती अभियानाअंतर्गत कृती आराखडा करत असताना कामे घ्यावीत.
अमृत सरोवर योजनेअंतर्गत जिल्ह्यात झालेले काम खूप चांगले असून या अंतर्गत ७५ पेक्षा अधिक सरोवरात दुरुस्ती करून त्याची पाणी साठवण क्षमता वाढवली तसेच ते सरोवर पुन्हा जिवंत करण्याचे काम जलसंधारण विभागाने केले आहे, हे अत्यंत कौतुकास्पद काम असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा यांनी जलसंधारण विभागाच्या विविध शाखांमार्फत केलेल्या कामांची माहिती दिली. तर कृषी उपसंचालक राजकुमार मोरे यांनी जलसंधारणमध्ये करण्यात येणाऱ्या कामांची माहिती सांगितली.
अमृत योजनेचे काम उत्कृष्ट
जलशक्ती अभियानाचे अधिक गतिमान पद्धतीने अंमलबजावणी होण्यासाठी महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर घ्यावा व जलशक्तीसे नारिशक्ती तक हे अभियानाचे असलेले ब्रीदवाक्य अगदी सार्थ ठरेल, असे अभियानाचे नोडल अधिकारी राकेश कुमार मीना म्हणाले. या वेळी केंद्रीय तांत्रिक अधिकारी श्रीमती पुर्णिमा बाराहते यांनीही जिल्ह्यातील जलसंधारणाच्या विशेषत: अमृत सरोवर योजनेत झालेल्या कामाविषयी समाधान व्यक्त केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.