Dr. Bhagwat Karad : लोकांचे जीवनमान उंचावणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवा

Union Finance Minister Dr. Bhagwat Karad : ज्या योजनांचा लाभ दिल्याने लोकांचे विशेषतः दारिद्र्यरेषेखालील लोकांचे जीवनमान उंचावते अशा योजना प्रभावीपणे राबवून लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणले पाहिजे,
Dr. Bhagwat Karad
Dr. Bhagwat Karad Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : ज्या योजनांचा लाभ दिल्याने लोकांचे विशेषतः दारिद्र्यरेषेखालील लोकांचे जीवनमान उंचावते अशा योजना प्रभावीपणे राबवून लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.

Dr. Bhagwat Karad
Regenerative Farming : हवामान बदलास पूरक पुनरुत्पादक शेती

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात मंगळवारी (ता. १३) डॉ. कराड यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. प्रभारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच सर्व विभागप्रमुख बैठकीस उपस्थित होते.

Dr. Bhagwat Karad
Agriculture Department : कृषी संचालकांचा मुदतपूर्व निवृत्तीचा अर्ज फेटाळला

महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी बचत गटांना द्यावयाचा अर्थपुरवठा, चांगले काम करणाऱ्या गटांना कर्ज उपलब्ध करून देणे, शहरी व ग्रामीण भागातील बचत गटांच्या सद्यःस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. तसेच उज्ज्वला गॅस योजना, आयुष्मान भारत कार्ड योजना, रेशन कार्ड व त्यामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ याबाबत डॉ. कराड यांनी आढावा घेतला.

डॉ. कराड म्हणाले, की आयुष्मान कार्ड ही आरोग्याची काळजी घेणारी योजना आहे. लोकांना आरोग्यावर होणारा आकस्मिक खर्चाचा भार कमी करणारी ही योजना आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजना अशा योजना या गरिबांना अर्थसाह्य करणाऱ्या योजना असून, त्यातून रोजगाराला प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक योजनेसाठी लाभ घेताना आधार कार्ड संलग्नता असणे आवश्यक असून त्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करावे, असे निर्देश डॉ. कराड यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com