Agriculture Department : कृषी संचालकांचा मुदतपूर्व निवृत्तीचा अर्ज फेटाळला

Director of Agriculture Retirement : ‘मला मुदतपूर्व निवृत्त करा,’ असा अर्ज कृषी संचालक रवींद्र भोसले यांनी केला असता राज्य शासनाने तो फेटाळून लावला आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे ः ‘मला मुदतपूर्व निवृत्त करा,’ असा अर्ज कृषी संचालक रवींद्र भोसले यांनी केला असता राज्य शासनाने तो फेटाळून लावला आहे. ते कृषी आयुक्तालयातील मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आहेत.

श्री. भोसले याच वर्षी निवृत्त होत आहेत. मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन विभागाचे संचालकपद प्राप्त करण्यासाठी वर्षानुवर्षे रस्सीखेच चालू असायची. मात्र, त्यांनी या पदावर येण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नव्हता. विशेष म्हणजे सेवाज्येष्ठता असूनही त्यांना संचालकपदी पदोन्नती दिली जात नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची राज्यभर चर्चा होती. अखेर तत्कालीन कृषी सचिव एकनाथ डवले यांनी श्री. भोसले यांच्या पदोन्नतीसाठी प्रयत्न केले व त्यांच्याकडे मृद संधारण विभागदेखील सोपविला.

Agriculture Department
Agriculture Department : ‘कृषी’तील २०३ उमेदवारांच्या नियुक्‍तीचा प्रश्‍न ऐरणीवर

“श्री. भोसले यांनी मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन विभागाची जबाबदारी घेतल्यानंतर अगदी टोकाचे बदल केले किंवा वेगळे प्रयोग केले असे म्हणता येणार नाही. तथापि, त्यांच्या काळात या विभागाची घडी बसली. गैरव्यवहाराकडे झुकणारा किंवा वादग्रस्त ठरणारा कोणताही निर्णय श्री. भोसले यांनी घेतला नाही. उलट, राज्यातील शेततळे योजनेला चालना दिली,” अशी माहिती आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.

श्री. भोसले यांच्या निवृत्तीला अवघे चार महिने राहिलेले असताना त्यांनी मुदतपूर्व निवृत्तीचा अर्ज काही दिवसांपूर्वी राज्य शासनाकडे पाठविला. त्यानंतर राज्यभर क्षेत्रिय अधिकाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले. त्यांना मुदतपूर्व निवृत्ती का हवी आहे, कोणत्या कारणांमुळे त्यांना तत्काळ संचालकपद सोडावेसे वाटते आहे, असे विविध सवाल अधिकाऱ्यांच्या चर्चेत होते. परंतु, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी श्री. भोसले यांचा फेटाळल्यामुळे चर्चेवर पडदा पडला आहे. “आपण चांगल्या पद्धतीने विभाग सांभाळता आहात. काही समस्या असल्यास शासनस्तरावरील यंत्रणा आपल्या पाठीशी असेल. त्यामुळे मुदतपूर्व निवृत्ती न घेता कार्यकाल पूर्ण करावा,” असे शासनाकडून श्री. भोसले यांना सूचविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, श्री. भोसले यांनी अचानक नोकरी सोडण्यासाठी दिलेल्या अर्जामागे इतर कोणतेही कारण नाही. प्रकृतीच्या बरी नसल्याच्या कारणास्तव पूर्णवेळ आरामासाठी ते सेवा थांबवू इच्छित होते. परंतु, त्यांचा अर्ज नामंजूर केला आहे. त्यामुळे ते आता पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.

सर्वात आधी झेंडेंचा क्रमांक
कृषी आयुक्तालयातील चारही संचालक या वर्षी निवृत्त होत आहेत. संचालक दिलीप झेंडे (विस्तार व प्रशिक्षण) सर्वात आधी म्हणजेच येत्या ऑगस्टमध्ये निवृत्त होत आहेत. त्यानंतर मार्चमध्ये सुभाष नागरे (प्रक्रिया व नियोजन) व दशरथ तांभाळे (आत्मा) यांची निवृत्ती होईल. जुलैअखेर रवींद्र भोसले (मृद संधारण) शेवटी सप्टेंबरमध्ये विकास पाटील निवृत्त होणार आहेत. त्यामुळे संचालकपद प्राप्त करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आतापासूनच जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com