Multi Cropping : बहुपीक पध्दतीतून आर्थिक स्थिरता

Dryland Farming : मी लहान असताना घरची परिस्थिती बेताचीच होती. अर्धा एकर कोरडवाहू शेती असल्याने आई-वडिलांना दुसऱ्यांच्या शेतीत रोजंदारीवर जावे लागत होते. परिस्थितीमुळे मला चौथीतून शाळा सोडावी लागली.
Multi Cropping
Multi CroppingAgrowon
Published on
Updated on

पांडुरंग बरळ

Fruit Farming : मी लहान असताना घरची परिस्थिती बेताचीच होती. अर्धा एकर कोरडवाहू शेती असल्याने आई-वडिलांना दुसऱ्यांच्या शेतीत रोजंदारीवर जावे लागत होते. परिस्थितीमुळे मला चौथीतून शाळा सोडावी लागली. शाळा सोडल्यानंतर आई-वडिलांबरोबर दुसऱ्यांच्या शेतावर मजुरीसाठी जात होतो.

मोठा झाल्यावर मजुरी करण्यापेक्षा काही तरी व्यवसाय करावा यासाठी टेलरिंगचे प्रशिक्षण घेत कामाला सुरुवात केली. निमगाव केतकी गावात दुकान सुरू केले. त्या वेळी लहान भाऊ महादेवदेखील शिक्षण घेत मजुरीचे काम करीत होता. बारावीपर्यंत शिक्षण घेऊन त्याने बॅटरी दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले आणि दुकान थाटले.

या कालावधीमध्ये दुकानात येणाऱ्या मित्रांमुळे शेती प्रयोग आणि दैनिक ‘ॲग्रोवन’विषयी माहिती मिळत गेली. घरची अर्धा एकर शेती, मात्र त्यात विशेष काय पिकत नव्हते. बॅटरी व्यवसाय आणि टेलरिंगच्या व्यवसायामुळे शेतकऱ्यांशी संवाद होत होता.

शेतीच्या गप्पांमधून पुन्हा स्वतःच्या शेतीकडे आम्ही ओढले गेलो. त्यातूनच १९९८ मध्ये अडीच एकर शेती विकत घेतली.

Multi Cropping
Mushroom Production : अळंबी उत्पादनातून मिळाली आर्थिक स्थिरता

फळबागेच्या दिशेने...

सुरुवातीला भाजीपाल्याची पिके घेतल्यानंतर डाळिंब लागवडीचा आम्ही निर्णय घेतला. विहिरीला पुरेसे पाणी नसल्याने ठिबक सिंचनाचा अवलंब केला. डाळिंबाचे चांगले उत्पादन घेत आर्थिक नफा मिळविला. मात्र तेलकट डाग रोगाने घात केला. तसेच २०१३ मध्ये अचानक गारपीट झाली. यामुळे डाळिंब बाग भुईसपाट झाली. कष्टाने वाढवलेली बाग डोळ्यासमोर भुईसपाट झाल्यानंतर नैराश्‍य आले होते.

तेलकट डाग रोगामुळे डाळिंबाला दरदेखील मिळत नव्हते. यामुळे डाळिंबाला काय पर्याय शोधायचा, असा विचार करत असतानाच, ॲग्रोवनमध्ये पेरू लागवडीची यशोगाथा वाचण्यात आली. थोडा अभ्यास करून आम्ही एक एकर पेरू बाग लावली. यानंतर जांभळाची यशोगाथा वाचून अभ्यास केला. राज्यभरातील शेतकऱ्यांशी चर्चा करत टप्प्याटप्पाने पेरू, जांभळाचे क्षेत्र वाढविले.

Multi Cropping
Vegetable Farming : बहुपीक पद्धतीतून साधले शेतीचे अर्थकारण

सध्या आमच्याकडे साडेचार एकर पेरू, दीड एकर सीताफळ, एक एकर पॅशन फ्रूट, सव्वा एकर शेवगा आणि अडीच एकर जांभळाची लागवड आहे. फळबाग वाढविण्याबरोबरच भविष्यातील पाण्याच्या गरजेसाठी सव्वा कोटी लिटर आणि एक कोटी लिटर क्षमता असलेली दोन शेततळी बांधली आहेत. साडेपाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नीरा डाव्या कालव्यातून पाणी आणून शेततळ्यात सोडले आहे.

शेळगाव येथे जागा विकत घेऊन विहीर खोदली आहे. इतक्‍या दूरवरून पाणी आणण्यासाठी मित्रांनी सर्व प्रकारची मदत केली. या शेततळ्यांमुळे बारमाही पाण्याची सोय झाली आणि फळबागेतून आर्थिक उत्पन्नही बऱ्यापैकी वाढू लागले. शेती व्यवस्थापन करताना पत्नी सौ. शुभांगी तसेच बंधू महादेव आणि वहिनी सौ. नीता यांच्यासोबत सातत्याने चर्चा होते. कुटुंबातील सर्वांच्या एकमताने आम्ही टप्प्याटप्प्याने शेती विकासाची दिशा पकडली आहे.

यशकथांनी दिली दिशा...
‘ॲग्रोवन''मधील शेतकऱ्यांच्या यशकथांनी आमच्या शेतीत बदल घडवून आणला. यशोगाथा वाचून पीक पद्धतीत बदल करणे, वेगळी पिके घेणे शक्‍य झाले. यशकथा प्रसिद्ध झाल्यानंतर प्रसंगी संबंधित शेतकऱ्याकडे जाऊन त्याचे प्रयोग आम्ही पाहतो.

त्याच्याशी चर्चा करतो. पुरस्कारप्राप्त, तसेच अनुभवी शेतकरी, कृषी विद्यापीठ, कृषी विभागातील तज्ज्ञांशी संपर्कात सतत राहून नवे ज्ञान आत्मसात करण्याचा आमचा प्रयत्न असतो.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com