Dairy Business : जिद्दीने कमावले दुग्ध व्यवसायात नाव

Diwali Article 2024 : धुळे जिल्ह्यातील मोहाडी (ता. धुळे) येथील कृषी पदवीधर जयेश प्रतापराव पाटील यांनी नोकरीच्या मागे न लागता दुग्ध व्यवसायाची वाट धरली.
Dairy Business
Dairy Business Agrowon
Published on
Updated on

Dairy Farming : जयेश हे मूळचे मोहाडी (ता.धुळे) येथील आहेत. वडील प्रतापराव व आजोबा रामलाल पाटील हे कृषी विभागात नोकरीला होते. त्यांची मोहाडी येथे तीन एकर शेती. जयेश यांची शेतीशी नाळ जुळलेली असल्यामुळे त्यांनी धुळे येथील कृषी महाविद्यालयातून कृषी पदवी घेतली. पुढे पुण्यात व्यवस्थापन विषयातून पदव्युत्तर पदवी पूर्ण केली.

त्या वेळेस जयेश यांच्यासोबतचे काही मित्र स्पर्धा परिक्षांमधून सरकारी अधिकारी झाले, तर काही खासगी कंपन्यांमध्ये नोकरीला लागले. मात्र जयेश यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या कर्तृत्वावर उद्योजक होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला होता.

Dairy Business
Dairy Farming : डोंगराळ, जंगलमय करूळची दुग्ध व्यवसायात आघाडी

व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यांनी दोन वर्षे प्रशिक्षण घेतले. त्यासाठी कोल्हापुरातील वारणा, गोकूळ दूध संघ तसेच पुणे येथील चितळे यांच्यासोबत संपर्क आला. दुग्ध व्यवसायाविषयी माहिती घेण्यासाठी महाराष्ट्रभर भ्रमंती केली. दरम्यानच्या काळात अनेक चांगले, वाईट अनुभवही आले. काही गोठ्यात संबंधित मालक माहिती देणे टाळायचे, वेळ नाही म्हणत अक्षरशः गोठ्याबाहेर जायला सांगायचे. परंतु जयेश खचले नाहीत. एक दिवस आपण दुग्ध व्यवसायात आपले नाव तयार करू, असा चंगच त्यांनी बांधला होता.

दुग्ध व्यवसायाची उभारणी करायचे ठरविले, मात्र त्यासाठी जवळ पैसे नव्हते. सुरुवातीच्या काळात बँकेकडून कर्ज मिळण्यास अडचणी आल्या. वित्तीय अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी धुळे शहरातील आपले घर विकले. त्यातून मिळालेल्या पैशांमधून धुळे शहरापासून पाच किमीवर असलेल्या पिंप्री शिवारात सात एकर शेती घेतली.

Dairy Business
Dairy Farming : सचोटी, प्रामाणिकता अन् एकीतून यशस्वी दुग्ध व्यवसाय

पशुधन, दुग्ध व्यवसाय, दुधाची मागणी, विक्री या सर्व बाबींचा अभ्यास केला. या व्यवसायातील संभाव्य अडचणी, नुकसानीच्या बाजू, व्यवस्थापनातील मंत्र लक्षात घेतले. त्यातून २००४ मध्ये वीस म्हशींचा गोठा बांधत व्यवसायाचा श्रीगणेशा केला. ‘माऊली डेअरी फार्म’ या नावाने सुरू केलेला दुग्ध व्यवसाय आज भरभराटीस आला आहे.

बँकेत पत वाढली

व्यवसायाच्या सुरुवातीला आर्थिक मदतीसाठी धुळ्यातील एका बँकेकडे कर्ज प्रस्ताव सादर केला. पण बँकेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. तब्बल दीड वर्ष आठ लाख रुपये कर्जासाठी बँकेचे खेटे घालावे लागले. जयेश यांचा चिवटपणा व पाठपुरावा पाहून शेवटी बँकही नमली व बँकेने आठ लाख रुपये कर्ज दिले.

कर्ज पाच वर्षांत फेडायची मुदत होती, परंतु फक्त तीन वर्षांमध्येच जयेश यांनी कर्ज फेडले. हे कर्ज फेडल्यानंतर याच बँकेने पुन्हा ३० लाख रुपये कर्ज दिले. २००८ ते २०१५ या कालावधीत पूर्ण कर्ज फेडले. आता सुमारे एक कोटी रुपयांचे कर्ज याच बँकेने जयेश यांना दिले आहे. ज्या बँका कर्जासाठी खेटे घालायला लावायच्या, त्या जयेश यांना कर्ज देण्यासाठी तयार होतात, एवढी पत त्यांनी दुग्ध व्यवसायातून कमावली आहे.

(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)

अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com