Tur Variety : मध्यम जमीन, मध्यम पर्जन्यमानास अनुकूल तूर वाण

Drought Resistant Variety : स्थानिक पर्जन्यमान आणि जमिनीचा पोत या बाबींची विचार करून लागवडीसाठी योग्य तूर वाणाची निवड करावी. तूर लागवडीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.
Tur Variety
Tur Variety Agrowon
Published on
Updated on

डॉ. विजयकुमार गावंडे

खरीप हंगामात विस्तृत प्रमाणात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक म्हणून तूर ओळखले जाते. सलग तसेच विविध पीक पद्धतीमध्ये तूर पिकाचा समावेश केल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. अवर्षणामध्ये पाण्याच्या अल्प उपलब्धीवर तग धरण्याचा या पिकाचा आनुवंशिक गुणधर्म आहे. तूर पिकाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्याने जमिनीतील आंतरस्तरावरील ओलावा व अन्नद्रव्यांचे शोषण करतात.

सध्या मुख्यतः विदर्भात लागवडीखालील बहुतेक वाण हे मध्यम लवकर आणि मध्यम ते उशिरा कालावधीचे आहेत. मागील काही वर्षांत तुरीचे मध्यम लवकर तयार होणारे तसेच मध्यम उशिरा तयार होणारे सुधारित वाण विकसित करण्यात आले आहेत. अधिक उत्पादन मिळविण्याकरिता जमिनीच्या प्रकार आणि पर्जन्यमा याप्रमाणे योग्य वाणांची निवड आवश्यक आहे. मध्यम जमीन तसेच मध्यम पर्जन्यमान असल्यास लवकर ते मध्यम लवकर तयार होणाऱ्या सुधारित वाणांची निवड करावी.

लवकर, मध्यम लवकर परिपक्व होणारे वाण

आय. सी. पी. एल. ८७ (प्रगती)

आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, हैदराबाद येथून १९८६ मध्ये प्रसारित.

दुबार पिकास योग्य वाण.

पहिल्या बहराच्या शेंगा तोडून दुसरा बहर घेता येतो.

दाणे मध्यम टपोरे, लाल रंगाचे.

१०० दाण्यांचे वजन १० ग्रॅम.

परिपक्वता कालावधी ः १२५ ते १३५ दिवस.

हेक्टरी उत्पादन ः ९ ते १० क्विंटल

ए. के. टी. ८८११

कडधान्य संशोधन विभाग, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याद्वारे १९९५ मध्ये प्रसारित.

परिपक्वतेचा कालावधी १४० ते १५० दिवस.

मर रोगास मध्यम प्रतिबंधक.

१०० दाण्याचे वजन ः ९ ग्रॅम.

हेक्टरी उत्पादन १० ते ११ क्विंटल.

Tur Variety
Tur Variety : फुले पल्लवी तुरीचा वाण प्रसारित

बी. डी. एन. ७०८

कृषी संशोधन केंद्र, बदनापूर (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) येथून २००४ मध्ये प्रसारित.

शेंगा गर्द लाल, दाणे चमकदार लाल रंगाचे.

१०० दाण्यांचे वजन १० ते १२ ग्रॅम.

मर व वांझ रोगास प्रतिबंधक, शेंगा पोखरणाऱ्या किडींना सहनक्षम.

परिपक्वता कालावधी १६० ते १६५ दिवस.

कमी पर्जन्यमानाच्या (५५० ते ६५० मिमी पाऊस) क्षेत्रात लागवडीसाठी योग्य.

हेक्टरी उत्पादन १६ ते १८ क्विंटल.

फुले राजेश्‍वरी

कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून २०१२ मध्ये प्रसारित

परिपक्वता कालावधी १४० ते १५० दिवस.

मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम.

दाण्यांचा रंग लाल

१०० दाण्याचे वजन ११.३ ग्रॅम.

हेक्टरी उत्पादन २२ क्विंटल

बी. डी. एन. ७१६

कृषी संशोधन केंद्र, बदनापूर (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) येथून २०१६ मध्ये प्रसारित.

मर आणि वांझ या रोगास प्रतिबंधक.

पर्जन्यावर अवलंबून असणाऱ्या भागात ठरावीक वेळेत पेरणीस योग्य

१६५ ते १७० दिवसांत परिपक्व होते

दाणे लाल व टपोरे

१०० दाण्यांचे वजन ११ ते १३ ग्रॅम.

हेक्टरी उत्पादन १८ ते २० क्विंटल

Tur Variety
Tur Variety : तूर उत्पादनवाढीसाठी गोदावरी वाण उत्तम

गोदावरी

कृषी संशोधन केंद्र, बदनापूर (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) येथून २०२१ ला प्रसारित

या वाणाची फुले मळकट पांढरी असून दाण्याचा रंग सुद्धा पांढरा असतो.

परिपक्वतेचा कालावधी १६० ते १६५ दिवस

मर आणि वांझ रोगास प्रतिबंधक

१०० दाण्यांचे वजन ११ ग्रॅम.

हेक्टरी उत्पादन १९ ते २४ क्विंटल

आय. पी. ए. १५-०६

भारतीय कडधान्य संशोधन संस्था, कानपूर येथून मध्य भारतासाठी २०२१ मध्ये प्रसारित

परिपक्वता कालावधी ः १४५ ते १५० दिवस.

मर रोगास प्रतिबंधक आणि वांझ रोगास प्रतिकारक्षम.

दाणे लाल रंगाचे.

१०० दाण्याचे वजन ९.९ ग्रॅम.

हेक्टरी उत्पादन १८ ते २० क्विंटल

फुले तृप्ती

मध्यम लवकर कालावधीचे हे वाण कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून २०२२ मध्ये प्रसारित

महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यात लागवडीसाठी शिफारस.

परिपक्वता कालावधी १६७ ते १६९ दिवस

मर आणि वांझ रोगास मध्यम प्रतिकारक, शेंगा पोखरणारी अळी आणि शेंगमाशी या किडींचा प्रादुर्भाव कमी आढळतो.

दाणे फिक्कट तपकिरी रंगाचे.

१०० दाण्यांचे वजन १०.६१ ग्रॅम

हेक्टरी उत्पादन २२ ते २३ क्विंटल

रेणुका

कृषी संशोधन केंद्र, बदनापूर येथून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडसाठी २०२२ मध्ये प्रसारित.

परिपक्वता कालावधी १६५ ते १७० दिवस

मर आणि वांझ रोगास प्रतिकारक्षम आहे.

शेंगा, फांद्या, खोड हिरवे, दाणे लाल.

१०० दाण्यांचे वजन ११.७० ग्रॅम.

हेक्टरी उत्पादन ः १९ ते २२ क्विंटल

- डॉ. विजयकुमार गावंडे, ९८२२७ ५५७७५

(वरिष्ठ शास्त्रज्ञ, कडधान्य संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com