
Solapur News : सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाने मे महिन्यातच हजेरी लावल्याने कधी नव्हे ते जिल्ह्यात खरीप पेरण्यांना जूनच्या पहिल्या आठवड्यातच सुरुवात झाली आहे. यंदा आतापर्यंत ५७ हजार ४७४ हेक्टरवर (१७.०१ टक्के) पेरणी झाली आहे. यामध्ये बार्शी, करमाळा आणि सांगोल्यामध्ये सर्वाधिक पेरणी झाली आहे.
गेल्या काही दिवसांत जिल्ह्याच्या काही भागांत पाऊस, काही भागात उघडीप असे वातावरण आहे. पण आतापर्यंतच्या पावसाचा विचार करता, जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला आहे. आता चांगला वाफसा मिळाल्याने शेतकऱ्यांनी पूर्वमशागतीसह खरीप पेरण्यांना सुरुवात केली आहे. पूर्वमोसमी पावसाने लावलेली दमदार हजेरी व येत्या काळातही चांगला पाऊस पडण्याचा अंदाज यामुळे यंदा खरिपाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ५४५ मिमी आहे. आतापर्यंत त्यापैकी २३२.२ मिमी पाऊस पडला आहे. जिल्ह्याचे खरिपाचे सरासरी क्षेत्र ३ लाख ३७ हजार ९६८ हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत ५७ हजार ४७४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
त्यामध्ये तृणधान्याची १८ हजार ६८८ हेक्टर, अन्नधान्याची ४२ हजार ५३२ हेक्टर आणि १४ हजार ९४२ हेक्टरवर गळीतधान्याची पेरणी झाली आहे. यामध्ये सोयाबीनची सर्वाधिक १४ हजार ८५९ हेक्टर, तुरीची ८३७१ हेक्टर, सूर्यफुलाची ४३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
तालुकानिहाय पेरणी क्षेत्र
उत्तर सोलापूर (१,६९३ हेक्टर), दक्षिण सोलापूर (१,७८५.५ हेक्टर), बार्शी (१४,६४० हेक्टर), अक्कलकोट (६,०६२ हेक्टर), मोहोळ (१,६७५ हेक्टर), माढा (१,२०० हेक्टर), करमाळा (१२ हजार १६५ हेक्टर), पंढरपूर (४४५ हेक्टर), सांगोला (११,२३१), माळशिरस (३,०३२ हेक्टर), मंगळवेढा (३,५४४ हेक्टर) ः एकूण ५७ हजार ४७४ हेक्टर (१७.०१ टक्के)
२२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
मे महिन्यात आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यात उन्हाळी पिकांसह फळबागांचे आतापर्यंत ३२ हजार ४४० शेतकऱ्यांचे २१ हजार ९८९ हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. सध्या या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरू आहे. त्यानंतर आणखी नेमका आकडा पुढे येणार आहे. त्याशिवाय मदतीचेही धोरण ठरले जाणार आहे, असे सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.