Ocean Temperature Rise: जागतिक हवामानासह पर्जन्यमानावर प्रभाव पाडणारा ‘एल निनो’ वेळेच्या आधीच येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागासह जगभरातील सर्व प्रमुख हवामान संस्थांच्या निरीक्षणांनुसार प्रशांत महासागरातील पाण्याच्या तापमानात सतत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार मे ते जुलै या तीन महिन्यांच्या कालावधीत एल निनो येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे..यंदा एल निनो येण्याची शक्यता पूर्वीच वर्तविण्यात आली आहे. मात्र तो कधी येणार यावरून हवामान प्रारूपे वेगवेगळे अंदाज दर्शवीत आहेत. पान ४ वर पान १ वरून.El Nino Impact: जगावर ‘एल निनो’चे सावट गडद.काही हवामान प्रारूपे एल निनोची स्थिती लवकर सुरू होईल, असे दर्शवितात, तर काही त्याची स्थिती हळूहळू निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करीत आहेत. जागतिक हवामानातील महत्त्वाचा घटक असलेल्या संकेत एन्सोच्या (एल निनो सदर्न ऑसिलेशन) उष्ण टप्प्याचे पुनरागमन या वर्षाच्या उत्तरार्धात होण्याची शक्यता जास्त आहे. तर अल्पकालीन अंदाजानुसार, जगभरात सरासरीपेक्षा जास्त तापमान कायम राहण्याची शक्यता आहे..ऑस्ट्रेलिया हवामान विभागाच्या मते, सध्या एन्सो स्थिती तटस्थ आहे, पण तापमान वाढीची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. प्रशांत महासागरातील तापमान मोजण्याचे महत्त्वाचे परिणाम निनो इंडेक्स ३.४ हे एप्रिल मध्यापर्यंत उणे ०.२७ अंश सेल्सिअस होता. म्हणजेच तटस्थ अवस्थेत होता..दक्षिण गोलार्धातील उन्हाळ्याच्या शेवटापासून निनो इंडेक्स ३.४ निर्देशांक सातत्याने वाढत आहे. अलीकडे समुद्राखालील तापमानवाढीमुळे येत्या काही आठवड्यांमध्ये समुद्रातील पृष्ठभागाचे तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकूणच हवामान प्रारूपे जागतिक स्तरावर उष्ण वातावरण दर्शवतात. परंतु पावसाचे वितरण प्रादेशिक पातळीवर वेगवेगळे असू शकते. २०२६ च्या उत्तरार्धात एल निनोची शक्यता वाढत असल्याने आगामी महिन्यांतील हवामान परिणामांबाबत अनिश्चितता वाढली आहे. अल्पकालीन हवामानविषयक संकेत देखील तापमानवाढीचे संकेत देत आहेत..El Nino Impact: ‘एल निनो’चे संकट मर्यादित राहणार: केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान.मॅडेन-जुलियन ऑसिलेशनमुळे (MJO) येत्या पंधरवड्यात पश्चिम पॅसिफिकमध्ये पश्चिमी वाऱ्यांची विसंगती निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सामान्यतः समुद्राचे तापमान वाढू शकेल. दरम्यान, ३० दिवसीय सदर्न ऑसिलेशन इंडेक्स उणे ७.७ पर्यंत घसरला आहे..‘पावसाचे असमान वितरण शक्य’अपेक क्लायमेट सेंटरने दिलेल्या हंगामी अंदाजानुसार, पुढील काही महिन्यांत जगातील बहुतांश भागात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. पर्जन्यमानाचा विचार करता या अंदाजानुसार भारत, मॅरिटाइम कॉन्टिनेंट, उत्तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण-पश्चिम पॅसिफिकच्या काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे..त्याचवेळी काही प्रदेशांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतासाठी तटस्थ ते उष्ण एन्सो स्थिती आणि उत्तरार्धात सकारात्मक आयओडीची शक्यता महत्त्वाची ठरू शकते. तटस्थ एन्सो स्थिती साधारणपणे सरासरी मॉन्सूनसाठी पोषक ठरते. परंतु एल निनोमध्ये एन्सोचे संक्रमण झाल्यास त्याची वेळ आणि तीव्रतेनुसार मॉन्सूनवर त्याचा परिणाम जाणवतो..तटस्थ ‘आयओडी’दरम्यान, इंडियन ओशियन डायपोल (आयओडी) देखील तटस्थ पातळीवर असून त्याचा निर्देशांक धन ०.०६ अंश सेल्सिअस आहे. बहुतांश मॉडेल्सनुसार शरद ऋतूपर्यंत ‘आयओडी’ तटस्थ राहण्याची शक्यता अधिक आहे. मात्र हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये आयओडीचा टप्पा विकसित होण्याची शक्यता वाढत आहे. याचा भारतीय उपखंडातील मॉन्सूनवर चांगला होऊ शकतो. आयओडी संदर्भातील अंदाजांमध्ये अजूनही अनिश्चितता कायम आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.