E- Sakal: ई-सकाळ पुन्हा ठरले नंबर १; मराठी डिजिटल माध्यमात दबदबा कायम

Marathi News Digital Media: मराठी डिजिटल विश्वात ई-सकाळचा दबदबा कायम आहे. अचूक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोचवण्याचे काम ई-सकाळ मागील २५ वर्षांपासून करत आहे.
Sakal No 1
Sakal No 1Agrowon
Published on
Updated on

Pune News: मराठी डिजिटल विश्वात ई-सकाळचा दबदबा कायम आहे. अचूक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोचवण्याचे काम ई-सकाळ मागील २५ वर्षांपासून करत आहे. याच विश्वासार्हतेला वाचकांनी भरभरून प्रेम दिले. त्यामुळे ई-सकाळने पुन्हा एकदा नंबर १ चे मराठी पोर्टल होण्याचा बहुमान पटकावला आहे. 

कॉमस्कोर हा जागतिक पातळीवर डिजिटल मीडिया विश्लेषण करणारा महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे. कॉमस्कोरच्या मे महिन्याच्या अहवालानुसार 'ई-सकाळ' मराठी वाचकांच्या गळ्यातील ताईत ठरले आहे. ‘कॉमस्कोअर’च्या अहवालानुसार, ई-सकाळला १६.५ मिलियन युनिक युजर्सचा प्रतिसाद मिळाला. लोकमत (१५.३ मिलियन), लोकसत्ता (६.७ मिलियन), टीव्ही९ मराठी (८.३ मिलियन) आणि एबीपी माझा (१०.६ मिलियन) यांना ई-सकाळने (१६.५ मिलियन) मागे टाकले आहे.

Sakal No 1
E-Sakal : ई सकाळच नंबर एक; मराठी डिजिटल माध्यमात वाचकांनी दिली पसंती

सकाळ माध्यम समुहाला ९३ वर्षांचा पत्रकारिकेचा वारसा आहे. सकाळ माध्यम समुहाने सुरुवातीपासूनच वाचकांची विश्वासार्हता मिळवली आहे. वेळेत आणि अचूक बातम्या वाचकांपर्यंत पोचवणे, सर्व बाजुंनी विषयांचे विश्लेषण, वाचकांच्या समस्यांचा वाचा फोडणे, सामाजिक भान आणि जबाबदारी बाळगत सकाळ माध्यम समुह काम करत आहेत. याच कामाला वाचकांची पसंती मिळत आहे.

Sakal No 1
E-Sakal: मराठी वाचकांची पहिली पसंती 'ई-सकाळ'; जगात नंबर एक

सकाळ माध्यम समुहाने २००० साली मराठी माध्यम समुहातील पहीली वेबसाईट ई-सकाळ सुरु केली. त्यानंतर ई-सकाळलाही वाचकांची पसंती राहीली आहे. ई-सकाळने रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. 

ई-सकाळ तंत्रज्ञान आणि अद्यावत बदलांना जुळवून घेत वाचकांनाही बदलत्या काळात सक्षम पर्याय उपलब्ध करून देत आहे. ई-सकाळने घडलेल्या घडामोडी वाचकांपर्यंत वेळेत पोचवण्याचे काम केले. तसेच राजकारण, समाजकारण, शेती, क्रीडा, तंत्रज्ञान क्षेत्रातील माहीती आणि घडामोडी वाचकांपर्यंत पोचवल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com