Pune News: विश्वासार्ह पत्रकारितेसाठी ओळखल्या जाणाऱ्या सकाळ मिडीया समुहाच्या डिजिटल प्लॅटफॉर्म ई-सकाळने पुन्हा एकदा पहिले स्थान मिळवले आहे. मराठी बातम्यांसाठी वाचकांची पहिली पसंती म्हणून ई-सकाळने आपली ताकद दाखवून दिली आहे..मराठी डिजिटल पत्रकारितेत ई-सकाळ ही वेबसाइट देशात सर्वाधिक वाचली जात असल्याची नोंद झाली आहे. कॉमस्कोअर या आंतरराष्ट्रीय संस्थेने डिसेंबर २०२५ च्या अहवालात ही माहिती दिली. ही संस्था वेबसाइट, अॅप आणि इतर डिजिटल माध्यमांवर किती लोक भेट देतात, याची मोजणी करते..E-Sakal: डिजिटल मराठी पत्रकारितेत ई-सकाळ पुन्हा एकदा नंबर वन; वाचकसंख्या १९.५ कोटींवर.या अहवालानुसार, ई-सकाळला तब्बल ५.६ कोटी युजर्स मिळाले आहेत. त्यामुळे मराठी डिजिटल न्यूजमध्ये ई-सकाळ नंबर १ ठरले आहे. विशेष म्हणजे, हा मान सलग दुसऱ्यांदा मिळाला आहे. वाढत्या स्पर्धेतही वाचकांनी ई-सकाळवरच विश्वास ठेवला आहे..E- Sakal: ई-सकाळ पुन्हा ठरले नंबर १; मराठी डिजिटल माध्यमात दबदबा कायम.आज इंटरनेटवर माहिती खूप वेगाने पसरते. पण खरी आणि विश्वासार्ह बातमी कुठे मिळेल, हा प्रश्न अनेकांना पडतो. अशा वेळी ई-सकाळला मिळालेला मोठा प्रतिसाद म्हणजे वाचकांनी दर्जेदार पत्रकारितेला दिलेली पसंती आहे. ई-सकाळवर बदलते ट्रेंड, ताज्या घडामोडी, राजकारण, देश-विदेश, लाइफस्टाइल, तंत्रज्ञान, मनोरंजन अशा अनेक विषयांवरील बातम्या सहज वाचायला मिळतात. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील वाचक या व्यासपीठाशी जोडले गेले आहेत..आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ई-सकाळने महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांपर्यंत पोहोचले आहे आणि त्यामुळे वाचकांचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. या यशामागे वाचकांचे प्रेम आणि पाठिंबा हेच खरे बळ आहे. पुढेही विश्वासार्ह, अचूक आणि जलद बातम्या देत राहण्याचा निर्धार माध्यमसमूहाने व्यक्त केला आहे. या समूहात दैनिक गोमंतक, ॲग्रोवन , साम टीव्ही आणि सरकारनामायांसारखी लोकप्रिय माध्यमेही कार्यरत आहेत, ज्यामुळे डिजिटल पोहोच आणखी वाढली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.