E-Peak Pahani : परभणीत २ लाख हेक्टरवरील पिकांची ई-पीकपेरा नोंद

E-Peak Pahani Entry : चालू रब्बी हंगामामध्ये परभणी जिल्ह्यात डिजिटल क्रॉप सर्वे मोबाइल अॅपच्या (डीसीएस अॅप) माध्यमातून शुक्रवारपर्यंत (ता. १७) २ लाख ४० हजार १०५ हेक्टर क्षेत्रावरील पीक पेऱ्याची नोंद करण्यात आली आहे.
E Peek Pahani
E Peek Pahani Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी ः चालू रब्बी हंगामामध्ये परभणी जिल्ह्यात डिजिटल क्रॉप सर्वे मोबाइल अॅपच्या (डीसीएस अॅप) माध्यमातून शुक्रवारपर्यंत (ता. १७) २ लाख ४० हजार १०५ हेक्टर क्षेत्रावरील पीक पेऱ्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आजवर रब्बीची ३ लाख ४ हजार हेक्टरवर पेरणी झाली. अद्याप ६४ हजार हेक्टरवरील ई-पीकपेरा नोंदणी बाकी होती.

यंदाच्या रब्बी हंगामात डिजिटल क्रॉप सर्वे मोबाइल अॅपद्वारे पीकपाहणीस १ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. परभणी जिल्ह्यात एकूण पीकपाहणी करावयाच्या शेतकऱ्यांच्या प्लॉटची संख्या ७ लाख ४५ हजार ८०५ आहे. त्यापैकी शेतकऱ्यांनी पीकपाहणी नोंदविलेल्या प्लॉटची संख्या २ लाख ५२ हजार ७०६ आहे. शेतकरी स्तरावर पीक पेरा नोंदणी केलेल्या क्षेत्राची संख्या २ लाख ३९ हजार ५८१ हेक्टर आहे.

E Peek Pahani
E-Peek Pahani : दोन लाख हेक्टरवरील पिकांची ई-पीकपाहणी

तर सहायक स्तरावर १९७.४८ हेक्टर क्षेत्राची पीकपाहणी करण्यात आली. दोन्ही मिळून जिल्ह्यातील एकूण पीकपेरा नोंदणी क्षेत्र २ लाख ४० हजार १०५ हेक्टर आहे. जिल्ह्यातील यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्र अंतिम झालेले नाही.

परंतु आजवर कृषी विभागाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार ३ लाख ४ हजार ५१७ हेक्टर (११२.४५ टक्के) झाली आहे. पेरणी क्षेत्र आणि डिजिटल क्रॉप सर्व्हे मोबाइल अॅपद्वारे पीकपाहणी क्षेत्र यांच्यात ६४ हजार हेक्टरचा फरक आहे. ही तफावत दूर करण्यासाठी उर्वरित क्षेत्राची ई-पीकपेरा नोंदणी करून घेण्याची आवश्यकता आहे.

परभणी जिल्हा डीसीएसद्वारे ई-पीकपेरा पाहणी स्थिती
(क्षेत्र हेक्टरमध्ये)
तालुका पीकपाहणी प्लॉट संख्या पीकपाहणी नोंद प्लॉट ई-पीकपेरा नोंद क्षेत्र

परभणी १३,३९४८ ४८,४५० ४८,९४५
जिंतूर ११,९६११ ४७,०६३ ४८,४८३
सेलू ७९,५६२ २४,५९३ २५,२१०
मानवत ५१,००७ १७,८४५ २०,५९५
पाथरी ५४,७५३ ९,८०९ ११,३८३
सोनपेठ ४४,०३२ १९,२७२ १८,०१७
गंगाखेड १,०५,४२० २४,०७८ १९,०३६
पालम ७०,६१० ३२,८४४ २४,१००
पूर्णा ८६,८६२ २८,७५२ २४,२३६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com