E Peek Pahani Summer Season 2026 News Updates: राज्यात उन्हाळी हंगामातील पीक पाहणी ८ एप्रिल पासून सुरु झाली आहे. शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीसाठी २४ मे पर्यंत मुदत आहे. तर सहाय्यक स्तरावरील पीक नोंदणी २५ मे २०२६ ते ८ जुलै २०२६ दरम्यान होईल. डिजिटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत उन्हाळी हंगामातील तसेच संपूर्ण वर्षातील पिकांची नोंद करता येते. ज्या शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात पिकांची लागवड केली आहे, त्यांनी वेळेत पीक पाहणी पूर्ण करावी, असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे. .या अंतर्गत शेतातील उभे पीक, शेतजमीन पडीत असल्यास, कायम पड अथवा चालू पड याची नोंद करणे अनिवार्य आहे. उन्हाळी हंगामातील ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल अॅपद्वारे करता येईल. सदर अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. हे अॅप डाऊनलोड करुन शेत शिवारातील पीक पाहणी विहित वेळेत पूर्ण करुन घ्यावी, जेणेकरुन शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल, असे आवाहन करण्यात आले आहे..Pik Pahani : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पीक पाहणीला मुदत वाढीची केली घोषणा.अचूक पीक नोंदणी आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पीक नोंदणी आवश्यक आहे. यामुळे पीक विमा, नुकसान भरपाई मिळण्यास मदत होते. 'सात-बारा'वर पिकांची अचूक नोंद होते. पाऊस, दुष्काळ यांसारखी आपत्ती आल्यास मदत मिळण्यास सोपे जाते. तसेच कृषी संबंधित अनुदान व लाभ मिळण्यास अडचण येत नाही..Insurance Claim Rejection: भरपाई नाकारणे विमा कंपनीला पडले महागात.पीक नोंदणीचे फायदे काय?पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभनैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान भरपाई मिळतेकिमान आधारभूत किंमत अंतर्गत हमीभावाने शेतमालाची विक्रीपीक कर्ज सुविधा उपलब्धअॅग्रीस्टॅक अंतर्गत सर्व शासकीय योजना व अनुदान .रब्बी हंगामातील पीक पाहणीसाठी ३१ मार्च ही अखेरची मुदत होती. डिजिटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत १०० टक्के पीक पाहणीची नोंद करणे बंधनकारक करण्यात आला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.