
Pune News : फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १६ व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ४० हजार ५४६ शेतकऱ्यांपैकी ४ लाख ३२ हजार ३२६ शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यात आली आहे.
४ लाख ३५ हजार ८३५ शेतकऱ्यांपैकी ४ लाख २० हजार ७५६ शेतकऱ्यांचे आधार जोडणी पूर्ण केले आहे. अद्यापही जिल्ह्यातील ८ हजार २२० शेतकऱ्यांची ई-केवायसी, तर १४ हजार ८१२ शेतकऱ्यांचे आधार जोडणी बाकी आहे.
शेतकरी सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायसी प्रमाणिकरण आवश्यक असून, त्याअनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ई-केवायसी प्रमाणिकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर राहणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाइलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पीएमकिसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा. बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले होते.
पीएम किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे. या मोहिमेत योजनेच्या निकषांच्या अधीन राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी. या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थींनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल, अशी माहिती कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
यापूर्वी राबविण्यात आलेल्या ६ डिसेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०२४ या ४५ दिवसांच्या मोहिमेदरम्यान शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण तसेच स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली.
ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी निर्देश दिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा कृषी विभागाने २१ फेब्रुवारीपर्यंत या मोहिमेची व्याप्ती वाढवली होती.
जिल्ह्यातील ई-केवायसी व आधार जोडणी
तालुका ई-केवायसी झालेले आधार जोडणी
आंबेगाव ३४,९८७ ३४,४७०
बारामती ५०,८३३ ४८,७५३
भोर २५,१८५ २४,५९३
दौंड ४१,४१९ ४०,८९०
हवेली १०,४११ १०,१८३
इंदापूर ४७,७१९ ४५,९७२
जुन्नर ५३,८२२ ५२,५५९
खेड ४५,३३२ ४३,७५२
मावळ १७,४६६ १७,३८३
मुळशी १२,८६८ १२,५७०
पुरंदर ३१,०३३ ३०,०४१
शिरूर ५२,३८८ ५१,०५०
वेल्हे ८,८६३ ८,५४०
एकूण ४,३२,३२६ ४,२०,७५६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.