
Nashik News : शेवरे (ता.बागलाण) येथील द्वारकाधीश साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या उसाचा पहिला हप्ता प्रतिटन रुपये २७०० प्रमाणे त्या पंधरवड्यामध्ये शासनाच्या धोरणानुसार ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.
आता ऊस उत्पादकांना नवीन ऊस लागवड, जमीन मशागत व खते खरेदी करण्यासाठी पैशाची निकड लक्षात घेता व्यवस्थापनाने प्रतिटन १५० रुपयेप्रमाणे ऊस बिल देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन सावंत यांनी सांगितले.
कारखाना कार्यक्षेत्रातील बागलाण, कळवण, साक्री, नवापूर व कार्यक्षेत्राबाहेरील निफाड, चाळीसगाव तालुक्यातील ऊस पुरवठा करण्याऱ्या शेतकऱ्यांमध्ये खरीप हंगामाच्या तयारीसाठी वेळेवर रक्कम मिळाल्यामुळे आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गळीत हंगाम २०२५-२६ वेळेत सुरू करण्यासाठी यंत्रसामग्री दुरुस्तीची कामे सुरू असून ऊस उत्पादकांचा ऊस वेळेत गाळप होण्यासाठी दैनंदिन ४०० ते ५०० टन जादा गाळप करण्यासाठी आधुनिकीकरणाचेही काम सुरू केले आहे.
ऊसविकास योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
ऊसतोडणी वाहतुकीचे करार सुरू करण्यात येणार असून कारखान्याचा लागवड हंगाम २०२५-२६ (ता.१) जुलैपासून सुरू होत आहे. त्यानुसार कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आडसाली ऊस लागवडीसाठी एक टन प्रमाणित बेणे मोफत देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतलेला आहे.
त्याचबरोबर ऊस उत्पादकांना सेंद्रिय,रासायनिक खते,ऊस बेणे,औषधे बिनव्याजी उधारीने देण्याचे धोरण जाहीर केले आहे. कारखान्याच्या ऊसविकास योजनांचा ऊस उत्पादकांनी लाभ घेवुन जास्तीत जास्त क्षेत्रावर उसाची लागवड करून आपले उसाचे उत्पादन वाढवावे असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.