Death Control : ‘आयएमडी’मुळे आपत्तिकाळातील मृत्यू नियंत्रणात

Mrutyunjay Mohpatra : अमेरिकेच्या तुलनेत भारतात नैसर्गिक आपत्ती काळात मरणाऱ्यांची संख्या नियंत्रणात आल्याचा दावा दिल्ली येथील भारतीय हवामान खात्याचे (आयएमडी) महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी केला.
Mrutyunjay Mohpatra
Mrutyunjay Mohpatra Agrowon

Nagpur News : यंत्रणांच्या अभावामुळे पूर्वी देशात २४ ते ३८ तासांपूर्वीचाच हवामानाचा अंदाज वर्तविणे शक्‍य होते. आता मात्र तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीमुळे महिनाभरापेक्षा अधिक कालावधीचा अंदाज सांगता येणे शक्‍य झाले आहे. त्यामुळेच अमेरिकेच्या तुलनेत भारतात नैसर्गिक आपत्ती काळात मरणाऱ्यांची संख्या नियंत्रणात आल्याचा दावा दिल्ली येथील भारतीय हवामान खात्याचे (आयएमडी) महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी केला.

भारतीय हवामान खात्याला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वनामती येथे बुधवारी (ता. ६) आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेत ते बोलत होते. मुंबई अग्निशमन दलाचे उपसंचालक डॉ. दीपक घोष, नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राचे उपसंचालक मोहनलाल साहू, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचे उपसंचालक सुनील कांबळे, माजी आमदार अनिल सोले, नागपूर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू, रेशीम उपसंचालक महेंद्र ढवळे यांची या वेळी उपस्थिती होती.

Mrutyunjay Mohpatra
Farmers Death : आत्महत्याग्रत्तांच्या मदतीची रक्कम १८ वर्षांत ‘जैसे थे’

डॉ. मोहपात्रा पुढे म्हणाले, की १५ जानेवारी १८७५ मध्ये ब्रिटिशांनी हवामान खात्याचा पाया रचला. त्या वेळी पूर आणि दुष्काळामुळे एकाच वेळी दहा लाखांपेक्षा अधिक व्यक्‍तींचा मृत्यू झाला होता. याला या वर्षी १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. हवामानाचा अंदाज वर्तविण्याच्या पद्धतीत आता मोठे बदल झाले आहेत. १९४५ पासून कृषी क्षेत्रासाठी हवामानाचा अंदाज देण्यास सुरुवात झाली.

आता तंत्रज्ञानामुळे अचूक अंदाज वर्तविणे शक्‍य होत असल्याने भारतच नाही तर इतरही काही देशांना आपण हवामान अंदाज विषयक सल्ला सेवा देतो. त्यावरुनच भारतीय हवामान खात्याच्या विश्‍वासार्हतेची कल्पना येते. नैसर्गिक आपत्तीचे अनुमान अचूक असल्याने पूर्वीच्या तुलनेत चक्रीवादळ, पूर व इतर कारणांमुळे मरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

Mrutyunjay Mohpatra
Agriculture Officer Recruitment Case : न्यायालयाचे अंतिम आदेश होताच नियुक्ती होणार

हे प्रमाण पूर्वीच्या लाख, हजारांवरून आता केवळ १० ते १०० व्यक्‍ती असे मर्यादित झाले आहे. मासेमार देखील आता समुद्रात उतरण्यापूर्वी भारतीय हवामान खात्याचा अंदाज पाहतात. परिणामी मासेमारांचे मृत्यू रोखण्यातही आम्ही यशस्वी झालो आहोत. राज्यपाल रमेश बैस यांनी ऑनलाइन पद्धतीने कार्यशाळेला उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या.

प्रति शेतकरी १२ हजार रुपये नुकसान टाळले

मध्य भारतात सिंचनाचा अभाव आहे सोबतच प्रति शेतकरी जमीनधारणा देखील कमी आहे. या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागल्यास त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. नजीकच्या काळात हवामानाचे अचूक अंदाज वर्तविले जातात. त्यामुळे त्यांना व्यवस्थापनविषयक निर्णय घेणे सुलभ होत असल्याने पीक नुकसान टाळता येते. त्याच्या परिणामी सरासरी १२ हजार रुपये एका शेतकऱ्याचे वाचतात. त्या माध्यमातून वर्षाला ३० हजार कोटीचे नुकसान एकट्या मध्य भारतात टाळणे शक्‍य झाले, असेही श्री. मोहपात्रा म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com