Pune News : उत्तर भारतात कडाक्याची थंडी कायम असून येथे दाट धुक्याचा प्रभाव दिसून येत आहे. ज्यामुळे येथील जनजीवन गारठले आहे. दिल्ली एनसीआरपासून उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानपर्यंत कडाक्याची थंडीची लाट असून येथे दररोज थंडी वाढत आहे. दरम्यान हवामान विभागाने एक अलर्ट जारी करताना १४ आणि १५ जानेवारीला दिल्लीत दाट धुके पडेल असे म्हटलं आहे. तसेच दिल्लीत वाहन चालवताना काळजी घ्या असे आवाहन देखील विभागाकडून करण्यात आले आहे.
आयएमडीने जाहीर केलेल्या शनिवारच्या (ता.१३ रोजी) आकडेवारीनुसार, दिल्लीसह एनसीआर उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील किमान तापमानात घट होत आहे. येथे थंडी वाढत आहे. तर शनिवारच्या आकडेवारीनुसार अनेक ठिकाणी किमान तापमान हे ३ ते ७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले आहे. याशिवाय पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसभर दाट धुके होते. तर पश्चिम बंगाल आणि दिल्लीतदेखील सकाळी असेच चित्र पाहायला मिळाले.
याच्याआधीच हवामान विभागाने दिल्लीबाबात सुचना दिली होती. तसेच येथे दाट धुक्याचा इशारा देताना १४ आणि १५ जानेवारीला दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये दाट धुके पडेल असे म्हटलं होते. तसेच वाहने चालवताना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते.
तसेच दाट धुक्यामुळे २२ रेल्वे उशिरा धावत असून त्याचा फटका प्रवाशांना बसत असून त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तर हवामान विभागाने सांगितल्या प्रमाणे येथील कमाल तापमान हे १९ सेल्सिअसच्या खाली जाऊन कमाल तापमान हे ४ सेल्सिअसपर्यंत राहू शकते. त्यामुळे दिल्लीकरांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दिल्लीचा पारा घसरला
पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अनेक ठिकाणी थंडीचा कहर दिसत आहे. येथे तापमान ७ अंशांच्या खाली गेले असून हरियाणातील नारनौल, दिल्लीतील मायापूर आणि उत्तर प्रदेशातील कानपूर येथे ३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. शनिवारी दिल्लीतील सफदरगंजचे तापमान ३.६ अंश नोंदवले गेले.
धुक्याबाबत अलर्ट
दिल्लीत एकीकडे धुके आणि थंडीची लाट असताना हवेची गुणवत्ता देखील घसरली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार आनंद विहारमधील हवेची गुणवत्ता खालावली आहे. तर ही स्थिती अशीच दोन दिवस राहण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.