Agriculture Department : ‘लाडक्या कंत्राटदारा’मुळे कृषी पुरस्कार्थी जेरीस

Problems of Agricultural Awardees : कृषी विभागाच्या सर्व मोठ्या कार्यक्रमांच्या कंत्राटांवर मोहोर उमटविणारा, भाजपाच्या एका शेतकरी नेता आणि आमदाराचा निकटवर्तीय असलेल्या ‘लाडक्या’ कंत्राटदाराने कृषी पुरस्कारार्थी आणि कृषी विभागाला शनिवारी (ता.२८) चांगलेच जेरीस आणले.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : कृषी विभागाच्या सर्व मोठ्या कार्यक्रमांच्या कंत्राटांवर मोहोर उमटविणारा, भाजपाच्या एका शेतकरी नेता आणि आमदाराचा निकटवर्तीय असलेल्या ‘लाडक्या’ कंत्राटदाराने कृषी पुरस्कारार्थी आणि कृषी विभागाला शनिवारी (ता.२८) चांगलेच जेरीस आणले. कृषी पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबईत आलेल्या पुरस्कारार्थींना अपुऱ्या सुविधेसह त्यांची गलिच्छ हॉटेलमध्ये निवास व्यवस्था केल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागले.

कृषी विभागाचे अधिकारी आणि मंत्री कार्यालयाने धावपळ करून नव्याने हॉटेल बुकिंग करून काही प्रमाणात सोय करण्याचा प्रयत्न केला. हे अधिकारी सायंकाळपर्यंत धावपळ करत पुरस्कारार्थींची सोय करत होते.

Agriculture Department
Agriculture Department : दहा ‘एसएओं’ना सहसंचालकपदी पदोन्नती

या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्याच्या वेळा ऐनवेळी निश्‍चित झाल्याने कार्यक्रमाची वेळही बदलण्यात आली. या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी भाजपचा पदाधिकारी असलेला आणि भाजपचा शेतकरी नेता असलेल्या एका आमदाराचा नीकटवर्तीय कंत्राटदार आहे. भाजपचा पदाधिकारी असल्याने त्याला कंत्राट देण्यात आले. कृषी आणि पशुसंवर्धन विभागाची प्रदर्शने, कार्यक्रम आयोजित करण्याचे कंत्राट आंदण दिल्यासारखे असते.

Agriculture Department
Agriculture Department : बीज गुणन केंद्रातील २४८ अस्थायी पदांच्या भरतीला मंजूरी

मात्र, पूर्वानुभव फारसा चांगला नसल्याने त्याला कंत्राट देण्यास कृषी विभाग अनुकूल नव्हता. तरीही थेट सहाव्या मजल्याचा वरदहस्त असल्याने त्याला कंत्राट देण्यात आले. त्याच्या कंपनीने मुंबईत ४४८ पुरस्कारार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांची राहण्याची व्यवस्था केली होती. मात्र या कंपनीने बुक केलेली हॉटेल अतिशय निकृष्ट दर्जाची होती. तसेच कुबट वास आणि गैरसोयींचे आगर असलेल्या या हॉटेलची तक्रार पुरस्कारार्थींनी केल्यानंतर मंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी धावपळ करून नव्याने काही हॉटेल बुक केली. तसेच कंत्राटदाराला धारेवर धरत नीट सोय करण्याची सूचना केली.

अंधेरीतील एका हॉटेलमध्ये आमची राहायची सोय केली. मात्र अतिशय गलिच्छ ठिकाण आहे. येथे जेवणाचीही सोय केली नसल्याने बाहेरून जेवण आणून खाल्ले. रेल्वे स्थानकावरून ने-आण करण्याची सोय केली होती, तीही उपलब्ध नसल्याने सकाळपासून आम्ही थांबून होतो.
ज्ञानेश्‍वर ढोरे, अकोला, युवा कृषी पुरस्कार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com