Methi Rate : मेथीचे दर कोसळल्याने शेतकऱ्याने ३ एकर क्षेत्र सोडले

Methi Farming : मेथी काढणीसाठी आली. नेमके दर कोसळले. त्यामुळे भाजी शेतातच सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुले ५० हजार रुपयांचा केलेला खर्च व मेहनत पूर्णपणे वाया गेली आहे.
Methi Farming
Methi FarmingAgrowon

Nashik News : तालुक्यातील नवे जाखोड येथील शेतकऱ्याने शेतात उपलब्ध पाण्यावर मेथी लागवड केली. मेथी काढणीसाठी आली. नेमके दर कोसळले. त्यामुळे भाजी शेतातच सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुले ५० हजार रुपयांचा केलेला खर्च व मेहनत पूर्णपणे वाया गेली आहे.

जाखोड येथील तुकाराम पवार यांनी डाळिंब बागेत आंतरपीक म्हणून मेथीला प्राधान्य दिले. तीन एकर क्षेत्रात शेताची मशागत करून तीन क्विंटल मेथी बियाणे टाकले. शेणखत रासायनिक खताची मात्रा दिली.

Methi Farming
Methi Lagwad : कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे मेथी पीक

निंदणी, पाणी भरणे यासह भाजीपाल्याची मोठी काळजी घेतली. ऐन भाजी बाजारात जाण्याच्या आधीच १० रुपयांत चार जुडी याप्रमाणे मेथीचे दर कोसळले. बाजारभाव न परवडणारा होता.

Methi Farming
E-Cart Scheme : ई-कार्टमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ

यामुळे मेथी काढणीसाठी खर्च न करता ती शेतातच सोडून दिली. तीन एकर मेथीवर पाणी फेरल्याने त्यांना सुमारे ५० हजार रुपये खर्च करून एक रुपयाही हाती लागला नाही.

भाव मिळेल या अपेक्षेने तीन एकरांत मेथी भाजीचे पीक घेतले. बाजारात आवक वाढल्याने अचानक भाव कोसळले. त्यामुळे मेथीची विक्री न करता शेतात मेंढ्या सोडल्या. रुपयाही मिळाला नाही. उलट ५० हजारांचे कर्ज झाले.
तुकाराम पवार, नवे जाखोड, जि. नाशिक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com