Rainfall Update : पावसाच्या उघडिपीने शेतकऱ्यांची चिंता वाढली

Ahlilyanagar Rain News : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने पावसाळा सुरु होण्याआधीच मशागतीची कामे झाले. शेतकऱ्यांनी यंदा दरवर्षीच्या तुलनेत १५ दिवस लवकर पेरण्या केल्या.
Farmer
Farmer Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे सुरु असलेल्या खरिपाच्या पेरण्याला काहीसा ब्रेक लागला आहे. पेरलेली पिके सुकू लागल्याने शेतकऱ्यांत चिंता वाढली आहे. अनेक भागात दुबार पेरणी करावी लागते की काय याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने पावसाळा सुरु होण्याआधीच मशागतीची कामे झाले. शेतकऱ्यांनी यंदा दरवर्षीच्या तुलनेत १५ दिवस लवकर पेरण्या केल्या. मात्र आता गेल्या आठ दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पेरलेले उगवण्याला काही भागात अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते की काय? याची चिंता सातावू लागली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा ७ लाख १६ हजार २०९ हेक्टर सरासरी क्षेत्र असून यंदा आतापर्यंत ३ लाख हेक्टरच्यावर पेरण्या झाल्या आहेत. पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक सरासरीच्या ७८ टक्के तर पारनेर तालुक्यात ६७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. कोपरगावला सर्वात कमी म्हणजे ४ टक्के पेरणी झाली आहे.

Farmer
Khandesh Rainfall : खानदेशात काही भागात दमदार पाऊस

कापसाची ७३ हजार हेक्टवर तर सोयाबीनची ६४ हजार हेक्टरवर पेरणी झाली. उडीद आणि मुगाचे क्षेत्रही बऱ्यापैकी वाढत आहे. यावर्षी मे महिन्यात अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने पावसाळा सुरु होण्याआधीच मशागतीची कामे झाले. शेतकऱ्यांनी यंदा दरवर्षीच्या तुलनेत १५ दिवस लवकर पेरण्या करण्याला मदत झाली.

मात्र दोन आठवड्यापासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे पेरणी केलेली पिके उगवण्यावर परिणाम होताना दिसत आहे. पावसाने उघडीत दिल्याने कोरडवाहू भागात जमिनीतील ओलावा संपत चालला आहे. त्यामुळे उगवण क्षमतेववर परिणाम आहेच, पण काही दिवसात चांगला पाऊस झाला नाही तर उगवलेलेही वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती लागली आहे.

Farmer
West Vidarbha Rainfall : वाशीम, बुलडाणा जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद

पाणी आवकही घटली

अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस नसला तरी भंडारादरा धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु आहे. मात्र पावसाचा जोर कमी असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाली आहे. भंडारदरा धरणात ५३ टक्के पाणीसाठा झाला असून मुळा धरण ४५ टक्क्यापर्यंत भरले आहे.

निळवंडे धरणातही पाणीसाठा वाढत असून सध्या धरणात ४५ टक्के पाणीसाठा आहे. कर्जत तालुक्यातील दुष्काळी भागातील सीना धरण यंदा मे मधील पावसानेच भरले आहे. अकोल्यातील अंबित, पिंपळगाव खांड, कोथळे, शिरपुंजे या धरणासह टिटवी लघुबंधारा भरला आहे.

“दोन वेळा ट्रॅक्टर,बी-बियाणे,खते यावर खर्च केला. आता जर पुन्हा पेरणी करावी लागली तर आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही. दुबार पेरणी केल्यास उत्पन्नाचे गणित पूर्णपणे कोलमडण्याची भीती आहे.’’
महादेव घोरतळे, शेतकरी, बोधेगाव ता. शेवगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com