Drought Condition : धुळे जिल्ह्यात २८ महसूल मंडलांत दुष्काळासंबंधी सवलती लागू

Drought Update : यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी पर्जन्यमान ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मिलिमीटरपेक्षा कमी झाले, अशा २८ महसूल मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे.
Maharashtra Drought Condition
Maharashtra Drought Conditionagrowon

Dhule News : जिल्ह्यात यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी पर्जन्यमान ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मिलिमीटरपेक्षा कमी झाले, अशा २८ महसूल मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. तसेच यासंबंधी आनुषंगिक सवलती लागू केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने नुकतीच दिली आहे.

Maharashtra Drought Condition
Drought Condition : संपूर्ण नांदगाव तालुक्यालाच दुष्काळी म्हणून घोषित करा ; अनिल आहेर

शासनाने १० नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या एकूण ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडलामध्ये जून ते सप्टेंबर कालावधीत सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मिलिमीटरपेक्षा कमी झाले अशा एकूण एक हजार २१ महसुली मंडलांमध्ये दुष्काळ घोषित करत विविध सवलती लागू करण्यास मंजुरी दिली आहे.

Maharashtra Drought Condition
Drought Condition : इंझोरी मंडलात दुष्काळ जाहीर करा

या गावांत सवलती

धुळे तालुक्यातील धुळे (शहर), आर्वी, सोनगीर, नगाव बुद्रुक, फागणे, मुकटी, धुळे (ग्रामीण), कुसुंबा, नेर (म.), लामकानी, शिरूड व बोरकुंड अशी १२ महसूल मंडले, साक्री तालुक्यातील म्हसदी (प्र.), दुसाने, निजामपूर, ब्राह्मणवेल, पिंपळनेर, उमरपाटा, दहिवेल, साक्री व कासारे अशी नऊ महसुली मंडले, तसेच शिरपूर तालुक्यातील शिरपूर, बोराडी, अर्थे, जवखेडे, होळनांथे, थाळनेर, सांगवी अशा सात महसूल मंडलांतील सर्व गावांसाठी या सवलती लागू राहतील.

सवलतींमध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीनिगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित न करणे आदींचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com