Dried Fish Rate : तुटवड्यामुळे सुकी मासळी महागली

Fish Market : एक जूनपासून पावसाळ्यात मासेमारीवर बंदी असल्याने या काळात सुक्या आणि खारवलेल्या मासळीला मोठी मागणी असते. सद्यःस्थितीत मात्र सुक्या मासळीची टंचाई असल्याने मोठ्या प्रमाणावर भाव वाढू लागले आहेत.
Fish Market
Fish MarketAgrowon

Dahanu News : एक जूनपासून पावसाळ्यात मासेमारीवर बंदी असल्याने या काळात सुक्या आणि खारवलेल्या मासळीला मोठी मागणी असते. सद्यःस्थितीत मात्र सुक्या मासळीची टंचाई असल्याने मोठ्या प्रमाणावर भाव वाढू लागले आहेत. तरीदेखील ती मिळेनाशी झाल्याने खरेदी करण्यासाठी लोकांनी गुजरातमधील शनिवारी भरणाऱ्या खत्तलवाडच्या आठवडा बाजाराकडे धाव घेतली आहे.

या वर्षी सुक्या आणि खारवलेल्या मासळीची टंचाई असल्याने कोळंबीच्या सोड्याचे दर हजार ते बाराशे रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तरीदेखील ही मासळी बाजारात कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचबरोबर सुके बोंबील, सुकट आणि करंदी, मांदेळी या मासळीचे भावही प्रचंड वाढले आहे. त्यांचे दर किलोला पाचशे ते सहाशे रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

Fish Market
Dried Fish Rate : कोकणात मागणीमुळे सुक्या मासळीचे दर वधारले

सुकी मासळी ही पावसाळ्यात मिळत नसल्याने हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात सुकवलेला मासळीचा वापर केला जातो. सध्या समुद्रातील माशांचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. जाळ्यात मासे कमी प्रमाणात सापडत आहेत. बोंबील, करंदी, मांदेळी, सुकट यांसारखे लहान मासे जाळ्यात सापडताच त्यांना सुकवण्याचे काम मच्छीमारांनी सुरुवात केले आहे.

मात्र, हे मासे सुकविण्यासाठी लागणारी जागाच मिळत नसल्याने मच्छीमारांना मासळी सुकवणे कठीण झाले आहे. सुक्या मासळीचे प्रमाण कमी झाले आहे. सुक्या माशांचा दुष्काळ निर्माण झाला आहे. म्हणून पावसाळ्याची बेगमी करण्यासाठी येथील लोक रविवारी भरणाऱ्या वाणगाव आणि सोमवारी भरणाऱ्या डहाणू व गुजरातमधील खत्तलवाड या आठवडा बाजाराकडे वळले आहेत.

Fish Market
Ornamental Fish : शोभिवंत माशांच्या संगोपनाच्या पद्धती
पावसाळ्यासाठी सुक्या मासळीची साठवणूक करून ठेवावी लागते. त्यामुळे बंदर ठिकाणच्या मासेमारी करणाऱ्या गावांतून बोंबील, सुकट, करंदी, मांदेळी यांसारखे लहान मासे खरेदी करावे लागतात. मासळी बाजारात मात्र अल्प प्रमाणात हे सुके मासे मिळत असल्याने त्याचे दर वाढले आहेत. काही वेळा सुक्या मासळींच्या तुटवड्यांमुळे हे मासे खरेदी करण्यासाठी गुजरातमधील खत्तलवाड येथे जावे लागते.
सुरेश करबट, नागरिक

सुक्या माशांचे दर (रुपयांत)

बोंबील (किलो) ५००

मांदळी (किलो) २००

करंदी (किलो) ३००

सोडे (किलो) १३oo

सुकट (१०० नग) ३५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com