Agriculture Education : व्यावसायिक शिक्षण देणारे कृषी महाविद्यालय

Chhatrapati Shahu Maharaj College of Agriculture : मराठवाड्यात नावाजलेले आणि शैक्षणिक ‘अ’ दर्जा टिकवून ठेवणारे कृषी महाविद्यालय म्हटले, की सर्वांच्या डोळ्यासमोर छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाचे नाव येते.
Chhatrapati Shahu Maharaj College of Agriculture
Chhatrapati Shahu Maharaj College of AgricultureAgrowon
Published on
Updated on

College of Agriculture : मराठवाड्यात नावाजलेले आणि शैक्षणिक ‘अ’ दर्जा टिकवून ठेवणारे कृषी महाविद्यालय म्हटले, की सर्वांच्या डोळ्यासमोर छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाचे नाव येते. शेती आणि शेतकरी हा जिव्हाळ्याचा विषय असणारे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव पद्माकर मुळे यांच्या प्रेरणेतून २००६ मध्ये कृषी महाविद्यालयाची सुरुवात झाली.

व्यावसायिक शिक्षणातून शिक्षित कुशल मनुष्यबळ निर्मिती, पारंपरिक शेतीला आधुनिक पद्धतीची जोड, ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्धता तसेच विद्यार्थांचा स्टार्टअप हा उदात्त हेतू ठेवून महाविद्यालयाची सुरुवात झाली.

तांत्रिक शिक्षणाबरोबर उच्च गुणवत्ताही निर्माण झाली पाहिजे, यावर पद्माकर मुळे यांचा नेहमी कटाक्ष असतो. त्यामुळेच हे महाविद्यालय राज्यभरात नावारूपास आले. महाविद्यालयातील सोयी सुविधा, उच्चविभूषीत प्राध्यापक वृंद, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व रोजगार निर्मितीचा चढता आलेख आहे. गेल्या दशकापासून कृषी महाविद्यालयास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा ‘अ’ दर्जा प्राप्त होत आहे.

कृषी महाविद्यालयाचे ४१ हेक्टर प्रक्षेत्र आहे. प्रयोगशाळेमध्ये आवश्यक उपकरणे आणि यंत्रसामग्री उपलब्ध आहेत. सर्व प्रकारच्या पुस्तकांनी परिपूर्ण असे वातानुकूलित ग्रंथालय आहे. याठिकाणी क्रमिक पुस्तकांच्या व्यतिरिक्त सामान्य ज्ञान, तत्त्वज्ञान, मनोरंजनात्मक पुस्तकाचा समावेश आहे. प्रशस्त आणि अत्याधुनिक व्यायाम शाळा उपलब्ध असून, मैदानी खेळासाठी तीन एकर क्षेत्रावर नरवीर तानाजी मालुसरे क्रीडा संकुल आहे. कबड्डी, क्रिकेट, हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, बुद्धिबळ, टेबल टेनिस, कॅरम आणि इतर खेळांचे स्वतंत्ररीत्या प्रशिक्षण दिले जाते.

Chhatrapati Shahu Maharaj College of Agriculture
Agriculture Loan : कार्यप्रणालीतील बदलाने पीककर्जाचा वाढेल टक्का

महाविद्यालयाचे विद्यार्थी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व ‘अश्‍वमेध’ आणि इतर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये नियमित करतात. महाविद्यालयात स्वतंत्र रोजगार आणि स्पर्धा परीक्षा मंच कार्यरत आहे. स्पर्धा परीक्षा, बँकिंग, पदव्युत्तर अभ्यासक्रम, आधुनिक शेती व उद्योजक अशा क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थांना माहिती दिली जाते.

यामुळे  महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक कमावत आहेत. महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना उद्योजकीय प्रशिक्षण दिले जाते. त्याचेच फलित म्हणजे काही विद्यार्थ्यांनी बी-बियाणे कंपनी सुरू केली आहे. काहीजण दुग्धजन्य प्रक्रियायुक्त पदार्थ, रोपवाटिका, कृषी निविष्ठा कंपनीचे मालक झाले आहेत. काही विद्यार्थी प्रगतिशील शेतकरी म्हणून राज्यभर ओळखले जातात.

Chhatrapati Shahu Maharaj College of Agriculture
Agriculture Education : मंथन - कृषी शिक्षण अन् संशोधनाचे

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळविण्यासाठी महाविद्यालय दरवर्षी दहा प्रकारची बक्षिसे, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देते. कृषी शास्त्रज्ञ स्व. डॉ. मधुकरराव ठोंबरे मेरिटोरियस ॲवॉर्ड, श्रीमती कौसल्याबाई शेळके स्मृतिप्रीत्यर्थ मेरिटोरियस ॲवॉर्ड, स्पोर्टपर्सन ऑफ द इयर ॲवॉर्ड, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरस्कार, स्पर्धा परीक्षेमार्फत निवड झालेले विद्यार्थी आणि नव उद्योजकांना पुरस्काराने सन्मानित केले जाते.

महाविद्यालयाचे विद्यार्थी हे शेतकरी आणि महाविद्यालयाचा दुवा म्हणून काम करतात. विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षण, शेती दिन, पीक प्रात्यक्षिक पंधरवडा असे उपक्रम राबविले जातात. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, रस्ता सुरक्षा जागृती अभियान, राष्ट्रीय मतदान दिन, संविधान दिवस, स्वच्छता अभियान राबविले जाते. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल, क्षेत्रीय भेटींचे आयोजन करण्यात येते.

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख यांचे  मार्गदर्शन आणि ५० वर्षे कृषी क्षेत्राचा अनुभव असणारे कृषी महाविद्यालयाचे संचालक डॉ. दत्तात्रय शेळके, प्राचार्य डॉ. प्रवीण बैनाडे यांचे मार्गदर्शन कृषी महाविद्यालयास लाभले आहे. ॲग्रीकेअर ॲवॉर्ड-२०२३ च्या माध्यमातून ‘बेस्ट ॲग्रिकल्चर कॉलेज’ हा मानाचा सन्मान कृषी महाविद्यालयास मिळाला आहे.

आमचे कृषी महाविद्यालय विविध पातळ्यांवर आघाडीवर आहे. यासाठी सर्वांचे पाठबळ आणि प्रोत्साहन मिळते. महाविद्यालयातर्फे विविध संकल्पना मांडून त्या राबवल्या जातात. रणजित मुळे हे  संस्थेचे अध्यक्ष असून सर्वांचा आमच्यावर विश्‍वास आहे. म्हणूनच ही संस्था आज नावलौकिकास आली आहे.
पद्माकर हरिभाऊ मुळे सचिव, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com