Dr. Madhav Gadgil : ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्र संघाचा पुरस्कार जाहीर

Champion of the Earth-2024 : २००५ पासून संयुक्त राष्ट्र संघ संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमांतर्गत 'चॅम्पियन ऑफ द अर्थ' पुसरकाराने पर्यावरण संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करतं. आजवर जगभरातील १२२ संशोधकांना या पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं आहे.
Dr. Madhav Gadgil
Dr. Madhav GadgilAgrowon
Published on
Updated on

Dr. Madhav Gadgil : ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्र संघाचा 'चॅम्पियन ऑफ द अर्थ-२०२४' हा सर्वोच्च सन्मान मंगळवारी (ता.१०) जाहीर झाला. २००५ पासून संयुक्त राष्ट्र संघ संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमांतर्गत 'चॅम्पियन ऑफ द अर्थ' पुसरकाराने पर्यावरण संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करतं. आजवर जगभरातील १२२ संशोधकांना या पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने कार्यासाठी सन्मानित केल्याने आनंद झाल्याची भावना डॉ. गाडगीळ यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, " शास्त्रज्ञ म्हणून मनापासून, वस्तुनिष्ठ आणि तर्कशुद्ध मांडणी करत राहिलो. मला लोकांमध्ये राहून काम करण्याची आवड आहे. त्यामुळे देशभरात आदिवासी ठिकाणांपासून ते अनेक ठिकाणी फिरलो. धोरणात्मक काम करता आले. त्याचा आनंद आहे." असंही गाडगीळ म्हणाले.

डॉ. गाडगीळ यांनी पश्चिम घाटात अनेक वर्ष संशोधन करून प्रकल्पांमुळे पर्यावरणचा ऱ्हासावर एक अहवाल तयार केला. त्यातून पश्चिम घाटातील पर्यावरणाच्या संवर्धनाकडे त्यांनी लक्ष वेधलं. लोकसहभागाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासाठी गाडगीळ वयाच्या ८२ व्या वर्षी देखील काम करत आहेत. त्यांच्या पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन कार्यासाठी भारत सरकारने 'पद्मश्री' आणि 'पद्मभूषण' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या कार्यकारी संचालक इंगर अॅडरसन यांनी जगभरातील पृथ्वीच्या झपाट्याने होत चाळलेआय वाळवंटीकरणाबद्दल चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "जगरभरातील ४० टक्के जमीन निकृष्ट जहालई आहे. दुष्काळाची वारंवारता वाढत चालली आहे. या समस्यांवर उपाय उपलब्ध आहेत. त्यासाठी जगभरातील चांगल्या व्यक्ती धडपड करत आहेत. पृथ्वीची स्थिती अधिक चांगली होऊ शकते, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत." असंही अँडरसन म्हणाल्या.

Dr. Madhav Gadgil
Bird Conservation : पर्यावरण, धनेश पक्षी संवर्धनाचा ‘संकल्प’

डॉ. माधव गाडगीळ कोण?

मागील अनेक दशकांपासून पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी डॉ. गाडगीळ संशोधन व सामाजिक कार्य करत आहेत. त्यांच्या संशोधनाचा उद्देश केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रकल्पाचा आणि विविध कार्याचा पर्यावरणावरील परिणाम शोधणं हाच राहिला आहे. डॉ. गाडगीळ यांनी एकूण ७ पुस्तके आणि २२५ वैज्ञानिक शोधनिबंध लिहिली आहेत. पश्चिम घाटावर वाढत्या प्रकल्पांचा आणि हवामान बदलाचा होणारा परिणाम तपासण्यासाठी २०१० साली गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीचा अहवाल गाडगीळ अहवाल म्हणून प्रसिद्ध आहे. देशभरात या अहवालानंतर पर्यावरण आणि हवामान यावर चर्चा होऊ लागली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com