Dr. Anand Nadkarni : माझा मूळ स्वभाव कोणता?

Thought Update : आतापर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन असा होता, की जे आनुवंशिक आहे ते बदलत नाही, कायमस्वरूपी असते. मात्र नवीन वैज्ञानिक प्रगती आणि शोध असे सांगतात, की आनुवंशिकतेला जसे वळण मिळते, त्यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात.
Dr. Anand Nadkarni
Dr. Anand NadkarniAgrowon

मागील भागात आपण स्वप्रतिमेचे चार खांब किंवा चार पॅटर्न समजून घेतले. आपला मूळ बळकट पॅटर्न कुठला याचाही विचार केला. प्रत्येक पॅटर्नची व्यक्ती सर्वसाधारणपणे स्वत:कडे आणि इतरांकडे कशी बघते? त्यांच्या विचारांचा साचा कसा असतो? (आकृती १)

या पॅटर्न्ससाठी त्यांच्या पॅटर्नचे नेमके गुणविशेष दर्शवणारी चिन्हे आज आपण बघूया. त्यांचे स्वगत साधारण काय असेल तेही मांडूया. एक तक्ता बनवूया. चित्र, चिन्ह किंवा तक्ता लक्षात ठेवायला जरा बरा पडतो. (आकृती २)

सर्व पॅटर्न स्वत:कडे आणि इतरांकडे कसे बघतात हे आपण पाहिलं. त्यावरून आपल्या लक्षात येईल, की –

- आग्रही माणूस सर्वांकडे समान पद्धतीने बघतो.

- कोणी लहान नाही किंवा महान नाही. मी देखील लहान किंवा महान नाही.

- आपण सगळेच गुण-दोष असलेली माणसं आहोत.

- त्यामुळे आग्रही माणसाचा संवाद समान पातळीवर, दोन्ही दिशांनी (ऐकणं आणि बोलणं / सांगणं) असा असेल. इतरांशी सुसंवाद होईल.

म्हणजेच आपल्याला स्वत:ला आणि दुसऱ्याला लाभदायक असलेला पॅटर्न कोणता? तर आग्रही, नंबर ३ चा पॅटर्न.

Dr. Anand Nadkarni
Dr. Anand Nadkarni : विचार म्हणजे काय?

तुम्ही म्हणाल, मी अगदी प्रयत्नपूर्वक पॅटर्न ३ वर असलो, पण समोरची व्यक्ती आक्रमक किंवा तटस्थ असली तर? मग काय करायचं नेमकं? समोरच्या व्यक्तीचे वागणे आपल्या हातात नाही हे खरेच. पण आपण आग्रही पॅटर्नवर असू, तर त्यातल्या त्यात समाधानकारक संवाद व्हायला मदत होईल. समोरची व्यक्ती जर –

१) आग्रही असेल तर अर्थातच सुसंवाद होईल.

२) आक्रमक असेल तर आपण स्वत:चं ध्येय लक्षात ठेवून संवाद साधू शकू. कधी त्याच्या अहंकाराला कुरवाळायचं, कधी त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि कधी त्याला ठामपणे उत्तर द्यायचं हे त्या परिस्थितीनुसार, उद्दिष्टानुसार ठरवू शकू. ती लवचिकता आणि ते स्वातंत्र्य आपण आग्रही भूमिकेवर असल्यामुळे आपल्याकडे असेल.

३) भिडस्त असेल तर त्या माणसाला आपण योग्य तो भावनिक आधार देऊ शकू. त्याच्या अविश्‍वासाची अवहेलना न करता त्यालाही समजून घेऊ शकू.

४) तटस्थ असेल तर आपण हे ठरवू शकू, की समोरच्याशी माझं संभाषण भावनिक नसलं तरी चालेल, पण त्याच्यापर्यंत मुद्दा पोहोचला, कामाचा विषय समजला की त्याचा योग्य प्रतिसाद मिळेल.

थोडक्यात, आग्रही भूमिका आपल्याला सर्व तऱ्हेच्या व्यक्तींसोबत कसं वागायचं ही लवचिकता देणारी आहे.

Dr. Anand Nadkarni
Dr. Anand Nadkarni : उद्योजकतेला पोषक दृष्टिकोन हवा

आपण सगळेच सगळ्या पॅटर्न वर जात येत असतो. कधी आपण भिडस्त होतो, तर कधी आक्रमक. मात्र आपला प्रत्येकाचा एक मूळ पॅटर्न (core pattern) असतो. कसा ओळखायचा तो? तो शोधायला मदत होईल असे काही प्रश्‍न आपण स्वत:ला विचारून पाहूया.

- बहुतेक वेळा, बहुतेक लोकांशी बोलताना, आपण सहजपणे, उत्स्फूर्तपणे कोणत्या पॅटर्नवर जातो?

- सहजपणे कोणत्या पॅटर्नवर रमतो, जास्तीत जास्त वेळ घालवतो?

- जास्तीत जास्त प्रसंगांमध्ये कोणता पॅटर्न आपल्या वर्तनात दिसतो?

या प्रश्‍नांची उत्तरे आपण आपलेच निरीक्षण करून शोधू लागलो, की आपल्याला आपला मूळ स्वभाव, कोअर पॅटर्न लक्षात येईल. पण गंमत म्हणजे, हा आपला मूळ पॅटर्नदेखील सदासर्वकाळ स्थिर किंवा पक्का नसतो. स्थळ, काळ, परिस्थितीनुसार आपला पॅटर्न बदलतो किंवा आपण प्रयत्नपूर्वक देखील तो बदलू शकतो.

काही वेळा आपण ज्या व्यक्तीसोबत आहोत त्यावर आपला त्या वेळचा पॅटर्न ठरतो. उदा. ऑफिसमध्ये साहेबासमोर भिडस्त असणारा सुधीर, घरी मात्र पॅटर्न ४ वर येतो म्हणजे आक्रमक होतो. व्यक्तीच्या व्यवसायाप्रमाणे किंवा त्याच्या भूमिकेप्रमाणे काही वेळा त्याचा एखादा पॅटर्न स्ट्रॉंग होऊन जातो. म्हणजे शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कडक आणि दबदबा असणाऱ्या सुधाताई, घरी मुलं-नातवंडांशीही तशाच कडक (पॅटर्न ४) वागतात. काही पॅटर्न आपण कुठल्या परिस्थितीत आहोत त्यानुसार बदलतात. म्हणजे लक्ष्मणराव हे अतिशय यशस्वी असे शेतकरी, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पॅटर्न तीन किंवा चारवर असतात. पण कुठल्याही आजाराबद्दल डॉक्टरशी बोलताना घाबरगुंडी उडते आणि ते पॅटर्न दोनवर येतात.

खरं तर आपण विशिष्ट भूमिकेतून बाहेर आलं की तो पॅटर्नही सोडता यायला हवा. एखाद्या पोलिस अधिकाऱ्याने दिवसभर गुन्हेगारासमोर ठेवलेला आक्रमक पॅटर्न, घरी आल्यावर (नवरा, वडील या भूमिकेत न शिरता) तसाच पत्नी वा मुलांसमोर सुरू ठेवला तर नातेसंबंध छान राहतील का?

म्हणजेच आपला मूळ पॅटर्न वेगळा असला तरी व्यक्तीसापेक्ष, भूमिकासापेक्ष आणि परिस्थितीसापेक्ष आपण इतर पॅटर्नवर जात राहतो. या बदलांची आपल्याला जाण असणं, ते भान आपण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे.

आपण आपल्या मूळ पॅटर्नमध्येच परिवर्तन आणू शकतो का? म्हणजे सहसा पॅटर्न २ वर भिडस्त असणारी व्यक्ती मूळ स्वभाव बदलून पॅटर्न ३ म्हणजे निर्धारी बनू शकते का? तर हो. नक्कीच मूळ स्वभाव किंवा कोअर पॅटर्न बदलता येतो.

हे परिवर्तन केव्हा शक्य होईल?

- माझी इच्छा असेल तर.

- मी स्वत:चा अभ्यास केला तर.

- मला योग्य मार्गदर्शन मिळाले तर.

कुठल्याही व्यक्तीचा पॅटर्न हा कायमस्वरूपी स्वभाव नाही तर परिवर्तनशील आहे. पॅटर्न २ वरचा (भिडस्त) माणूस आग्रही होऊ शकतो. उदाहरणार्थ, भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. एक साधी मध्यमवर्गीय मुलगी, भिडस्त स्वभावाची. मात्र तिने निर्धार केल्यावर परदेशात जाऊन जिद्दीने वैद्यकीय शिक्षण व पदवी घेऊन परतली.

Dr. Anand Nadkarni
Dr. Anand Nadkarni : विचारांचा स्वीकार म्हणजे काय?

आक्रमक व्यक्तीने स्वत:ची विचारांची व्याख्या व्यापक केली तर ती आग्रही (पॅटर्न ३) होऊ शकते. वाल्याचा वाल्मीकी झाला, अंगुलीमाल बुद्धाचा अनुयायी झाला. कधी उलटही होतं. तीन नंबरवरचा माणूस स्वत:ची व्याख्या जेव्हा संकुचित करतो तेव्हा तो स्वार्थी, आक्रमक बनून जातो. किंवा कधी तटस्थ किंवा भिडस्त होऊन विझूनही जातो.

काय घडणं सर्वांसाठी हितकारक आहे? तर जास्तीत जास्त माणसांनी जास्तीत जास्त काळ पॅटर्न तीनवरती म्हणजे आग्रही पॅटर्नवरती राहायला हवंय.

आनुवंशिकता, संस्कार, संस्कृती आणि वेगळेपणा, अर्थात Signature हे चारही घटक कायम स्वरूपी नसून सतत बदलणारे, म्हणजे गतिशील असतात. आतापर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन असा होता, की जे आनुवंशिक आहे ते बदलत नाही, कायमस्वरूपी असते. मात्र नवीन वैज्ञानिक प्रगती आणि शोध असे सांगतात, की आनुवंशिकतेला जसे वळण मिळते त्यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. चोराचा मुलगा साधू आणि साधूचा मुलगा चोर बनू शकतो.

त्यामुळे आपला मूळ स्वभाव किंवा पॅटर्न काहीही असला तरी सजगपणे निरीक्षण करून, आपण पाहिलेले चार पॅटर्न लक्षात घेऊन, स्वत:त बदल घडवणे नक्कीच शक्य आहे. उद्योजक शेतकरी असा हितकर बदल करायला नक्कीच उत्सुक असतो.

संशोधन आणि शब्दांकन : डॉ. सुवर्णा बोबडे व शिल्पा जोशी

kartashetkari@gmail.com

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com