Technology Education : सिन्नरमधील डॉ.आम्रपाली आखरे संशोधन, शिक्षण, विस्तार क्षेत्रांत कर्तबगार शास्त्रज्ञ

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कार्यरत डॉ. आम्रपाली आखरे (जगताप) या वनस्पती जनुकीयशास्त्र विषयाच्या शास्त्रज्ञ आहेत. संशोधन, शिक्षण व विस्तार या तीनही क्षेत्रांत मोलाचे व प्रशंसनीय कार्य करून त्यांनी विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करण्यासह शेतकऱ्यांनाही विविध तंत्रज्ञानांचा मोठा लाभ दिला आहे.
Technology Education
Technology EducationAgrowon

Nashik Story : शिक्षण हाच उन्नतीचा मार्ग आहे, त्यात तडजोड नाही ही शिकवण आई- वडिलांनी आपल्या मुलीच्या म्हणजे डॉ. आम्रपाली अतुल आखरे (जगताप) यांच्या मनावर बालवयातच कोरली. कुंदेवडी (ता. सिन्नर, जि. नाशिक) हे मूळगाव असलेल्या आखरे यांनी पदवी ते पीएचडीपर्यंतचे शिक्षण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून (अकोला) घेतले.

बटवाडी (जि. अकोला) येथील प्रतिष्ठित शेतकरी आखरे कुटुंबातील अतुल यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी शिक्षण त्यांनी सुरू ठेवले.

आयुष्यातील हा आव्हानात्मक काळ होता. माहेर आणि सासरकडील मंडळींच्या पाठिंब्यावरच विविध आव्हाने सक्षमपणे पेलली.

मुलांचा सांभाळ करीत ‘जेनेटिक्स अँड प्लॅंट ब्रीडिंग’ (मॉलिक्यूलर ब्रीडिंग) विषयात प्रबंध सादर करून ‘विशेष प्रावीण्याने’ ‘पीएचडी’ पदवी) प्राप्त करणाऱ्या पहिल्या विद्यार्थिनी होण्याचा मान त्यांच्या नावे आहे. पदवी शिक्षणातही रोख पारितोषिकांसह दोन सुवर्ण व एक रजत पदक त्यांनी प्राप्त केले आहे.

Technology Education
Nashik News : ‘प्रशासकीय गतिमानता’मध्ये नाशिक विभागाची आघाडी

प्रमुख पदांची सक्षम जबाबदारी

डॉ. आम्रपाली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात बियाणे संशोधन अधिकारी तसेच संशोधन उपसंचालक (बियाणे) पदी कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या लक्षांकित बियाणे उत्पादनाचे नियोजन, देखरेख आणि वितरण या महत्त्वाच्या बाबी कुलगुरू व संशोधन संचालक यांच्या मार्गदर्शनात त्या सक्षमपणे राबवतात.

विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रकल्पांच्या ‘नोडल’ अधिकारी तसेच बियाणे तंत्रज्ञान संशोधनाच्या अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाच्या त्या प्रमुख आहेत. शेतकरी उपयुक्त तंत्रज्ञान शिफारशी विभागामार्फत करण्यात येतात.

भारत सरकारच्या पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदे अंतर्गत बाह्य अनुदानित तीन प्रकल्प त्या राबवत आहेत.

महत्त्वपूर्ण संशोधन

डॉ. आम्रपाली यांना विद्यापीठाचा उत्कृष्ट संशोधक तर ‘महाराष्ट्र सोसायटी ऑफ एक्स्टेन्शन एज्युकेशन’ द्वारा ‘नॅशनल ॲवॉर्ड ऑफ रेकग्नेशन ॲण्ड ॲप्रिसिएशन’ सन्मान मिळाला आहे.

त्यांच्या संशोधनावर आधारित चार वनस्पती डीएनए बारकोड्‍स तसेच सहा डीएनए सिक्वेन्स (जनुकीय साखळी) हे राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान माहिती केंद्राच्या जनुकीय बॅंकेत समाविष्ट केले आहेत.

५० हून अधिक संशोधन व तांत्रिक शोधनिबंध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित आहेत. मेळघाटातील अतिदुर्गम भागात आदिवासींच्या आर्थिक उन्नतीसाठी अभिनव प्रकल्प त्या राबवत आहेत.

Technology Education
Grape Industry : ‘रेसिड्यू फ्री’ द्राक्षातील मोलाचं संशोधन

संशोधन प्रसार व फायदा

चिकाटी, सातत्य आणि कार्यकौशल्याच्या जोरावर डॉ. आम्रपाली यांनी विद्यापीठात जैवतंत्रज्ञान केंद्रांची उभारणी केली. प्रकल्प प्रमुख व उपप्रमुख म्हणून १० कोटींपर्यंतचा निधी आणला. केंद्रात दरवर्षी १२ ते १४ विद्यार्थी संशोधन करतात. १५ पेक्षा अधिक तांत्रिक शिफारशी त्यांनी आपल्या संशोधनामार्फत दिल्या.

विद्यापीठातील ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रमात त्या अग्रेसर असतात. विद्यापीठाचे उत्तम वाण अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी १५७ सामंजस्य करार शेतकरी गट वा कंपन्यांसोबत करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

विदर्भातील शेतकरी व मेळघाटातील आदिवासींद्वारे जतन वा उत्पादित पीकवाणांची कायदेशीर नोंदणी होण्यासाठी डॉ. आम्रपाली प्रयत्नशील आहेत. आठ वाणांच्या नोंदणीसाठी प्रस्ताव सादर केले आहेत. हे सर्व करताना कुटुंबातील सदस्यांची विशेषतः कृषी पदवीधर पती अतुल यांची प्रत्येक टप्प्यावरील साथ मोलाची ठरली आहे.

विद्यापीठातील अधिकारी, सहकाऱ्यांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे ठरल्याने इथपर्यंतची वाट सुकर झाल्याचे डॉ. आम्रपाली सांगतात. महिला दिन कार्यक्रमात अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या हस्ते डॉ. आम्रपाली यांचा सन्मान झाला आहे.

डॉ. आम्रपाली आखरे (जगताप), ९८८१८८००८३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com