Post-Harvest Technology : वर्गीकरण, प्रतवारीकडे दुर्लक्ष नको

Crop Grading: फळे व भाजीपाल्यांची गुणवत्ता, टिकाऊपणा, विक्री क्षमता आणि बाजारभावात अपेक्षित दर मिळविण्यासाठी योग्य वर्गीकरण (sorting) आणि प्रतवारी (grading) करणे अत्यावश्यक असते.
CropGrading
Crop GradingAgrowon
Published on
Updated on

डॉ.विक्रम कड, डॉ.गणेश शेळके, डॉ.सुदामा काकडे

फळे व भाजीपाल्यांची गुणवत्ता, टिकाऊपणा, विक्री क्षमता आणि बाजारभावात अपेक्षित दर मिळविण्यासाठी योग्य वर्गीकरण (sorting) आणि प्रतवारी (grading) करणे अत्यावश्यक असते. बाजारपेठेतील विक्रीसोबतच प्रक्रिया उद्योगांमध्ये उपयोग करतानाही त्यांच्या योग्य त्या गुणवत्तेवर विशेष भर दिला जातो. गुणवत्तेचे मोजमाप हे वेगवेगळ्या निकषांवर केले जाते. ते जाणून घेऊन त्याचा अवलंब करणे गरजेचे असते.

शेतातून काढणी केल्यानंतर मिळालेला शेतीमाल हा वेगवेगळा आकारमानाचा, रंगाचा, वजनाचा आणि गुणवत्तेचा असू शकतो. पारंपरिक पद्धतीमध्ये मनुष्यबळाच्या साह्याने मानवी कौशल्यावर आधारीत वर्गीकरण किंवा प्रतवारी प्राधान्याने केली जात असे. मात्र त्यासाठी आवश्यक त्या कुशल मजुरांची उपलब्धता ही सध्या मोठी समस्या ठरत आहे.

अशा स्थितीमध्ये बहुतांश शेतकरी आणि प्रक्रिया उद्योग हे लहानमोठ्या क्षमतेच्या यंत्रांकडे वळत आहेत. वर्गीकरणामध्ये समान रंग, आकार, वजन आणि गुणवत्तेची फळे किंवा भाज्या एकाच गटात वेगळ्या काढल्या जातात. त्यामुळे अपेक्षित त्या गुणवत्ता आणि प्रतीचा माल ग्राहकांना योग्य त्या कमी- जास्त दरामध्ये खरेदी करणे शक्य होते.

CropGrading
Cotton Grading : कापूस वेचणी, प्रतवारी दरम्यान घ्यावयाची काळजी

त्यामुळे मालाची हाताळणी सोपी होते. वाहतूक आणि साठवणूक व्यवस्थापन सुधारते. उत्पादकांना बाजारातील स्पर्धेत टिकून राहणे शक्य होते. बाजारात निर्यातक्षम आणि उच्च गुणवत्तेचे फळे-भाजीपाला पोहोचविण्यासाठी प्रतवारी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. प्रतवारी ही प्रामुख्याने दोन प्रकारे केली जाते.

१) दृश्य निरीक्षणावर आधारित (मॅन्युअल) किंवा २) यांत्रिक पद्धतीने.

अलीकडे आधुनिक तंत्रज्ञानामुळे हस्तचलित, अर्धस्वयंचलित किंवा संपूर्ण स्वयंचलित अशी वर्गीकरण आणि प्रतवारी यंत्रे उपलब्ध होत आहेत. त्यामुळे अचूक निर्यातक्षम माल वेगळा करणे शक्य होते. कार्यक्षमता वाढत असल्यामुळे प्रक्रियेचा वेग वाढतो. मनुष्यबळही कमी लागते.

जागतिक आणि भारतीय दृष्टिकोन

जगभरात फळे आणि भाजीपाला उत्पादनामध्ये प्रमुख उत्पादक देश म्हणून अमेरिका, चीन, भारत, ब्राझील, मेक्सिको, तुर्की, इटली, नेदरलँड्स या देशांचा क्रमांक लागतो. उत्पादीत झालेल्या फळे, भाज्यांची निर्यात करताना आयातदार देश किंवा त्यांच्या संघटनांकडून विशिष्ट मानके आणि गुणवत्ता निकष तयार केलेले असतात.

CropGrading
Lemon Grading Machine : लिंबू प्रतवारीसाठी हस्तचलित यंत्र

त्यावर आधारीत दर्जा निर्धारणानुसार दरही ठरलेले असतात. प्रक्रिया उद्योगांकडूनही त्यांच्या आवश्यकतेनुसार विशिष्ट असे निकष ठरवण्यात आलेले असतात. उदा. फळांचे रस, मुरांबा, सुकवलेले फळे, प्युरी इ. तयार करताना समान गोडी किंवा चवीची फळे आवश्यक असतात. असा योग्य दर्जाचा, गुणवत्तेचा शेतीमालाची निर्यात ही अत्यावश्यक बाब बनलेली आहे.

विकसित देशांमध्ये उच्च दर्जाची उत्पादने सुनिश्‍चित करण्यासाठी कठोर मानके आणि प्रक्रिया राबवल्या जातात. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फळे आणि भाजीपाला उत्पादक देश बनला असताना निर्यातीच्या अनुषंगाने त्यांचे पालन करणे अत्यंत गरजेचे ठरत आहे.

परिणामी, केंद्र आणि राज्य सरकारे स्थानिक शेतकऱ्यांना प्रतवारी आणि वर्गीकरणाचे तंत्रज्ञान उपलब्ध करण्यासाठी विविध योजना राबवत आहेत. राष्ट्रीय कृषी बाजार (eNAM) सारख्या ऑनलाइन पोर्टलवरही शेतकऱ्यांना योग्य त्या निकषांचा माल विक्रीसंदर्भात आवश्यक ती मदत मिळू शकते.

CropGrading
Cotton Grading : कापूस वेचणी, प्रतवारी दरम्यान घ्यावयाची काळजी

प्रतवारी व वर्गीकरणाचे निकष

प्रतवारी आणि वर्गीकरणामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढते. एकसारख्या आकाराची, रंगाची आणि गुणवत्तेची फळे आणि भाज्या ग्राहकांना आकर्षित करतात. खराब आणि निकृष्ट उत्पादने वेगळी केल्यामुळे उत्पादनाची एकूण गुणवत्ता उंचावते.जागतिक बाजारपेठेत फळे आणि भाजीपाला वर्गीकरणासाठी आणि प्रतवारीसाठी खालील निकष लागू होतात :

आकार : फळे आणि भाजीपाल्यांचे समान आकार असणे आवश्यक. वजन : प्रत्येक फळाचे वजन निश्चित श्रेणीत असावे. रंग आणि पोत : फळांचे रंग आणि पोत एकसमान आणि आकर्षक असावेत. परिपक्वता : फळे योग्य परिपक्व अवस्थेत असावीत. शारीरिक दोष : फळांवर डाग, कीड किंवा इतर दोष नसावेत. आंतरराष्ट्रीय मानके (ISO, CODEX) पाळणे आवश्यक आहे.निर्यातीसाठी विशिष्ट निकष लक्षात घेणे आवश्यक आहे.पॅकिंग संदर्भातील आवश्यक त्या मापदंडाचे पालन करणे.

भारतातील बाजारपेठेसाठी खालील निकष लागू होतात.

अॅगमार्क (Agmark) ग्रेडिंग प्रणाली : फळे आणि भाजीपाल्यांचे ग्रेडिंग मानक अपेडाच्या (Agricultural and Processed Food Products Export Development Authority) निकषांची पूर्तता करणे. त्यात निर्यात प्रक्रिया आणि मानकांचा समावेश असतो.

CropGrading
Export-Grade Mango Registration: निर्यातक्षम आंबा नोंदणीसाठी अंतिम संधी; फक्त दोन दिवस शिल्लक!

FSSAI : अन्न सुरक्षा आणि दर्जानिर्धारण फळे आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योगाच्या मागणीनुसार ग्रेडिंग बाजारपेठ मूल्य : चांगल्या प्रतवारी केलेल्या उत्पादनांना बाजारात अधिक भाव मिळतो. ग्राहक उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांसाठी अधिक पैसे देण्यास तयार असतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते.

साठवणुकीचा कालावधी : प्रतवारी केल्यामुळे खराब झालेली आणि सडलेली फळे आणि भाज्या वेगळी केली जातात. त्यामुळे उत्पादनाची साठवणूक क्षमता वाढते. सडलेले उत्पादन इतर उत्पादनांनाही खराब करू शकते, त्यामुळे प्रतवारी महत्त्वाची आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर : आजकाल फळे आणि भाज्यांच्या प्रतवारीसाठी आधुनिक यंत्रांचा उपयोग केला जातो. या यंत्रांमुळे प्रक्रिया अधिक जलद आणि अचूक होते. उदाहरणार्थ, ऑप्टिकल ग्रेडिंग मशिन फळांचा रंग, आकार आणि दोष शोधू शकते.

वर्गीकरण आणि प्रतवारीची व्याख्या

वर्गीकरण (सॉर्टिंग) हे भौतिक वर्गीकरण आहे, तर प्रतवारी (ग्रेडिंग) ही गुणवत्ता आधारित श्रेणी निर्मिती आहे. पुरवठा साखळीत, सॉर्टिंगमुळे एकसमान उत्पादने पॅक केली जातात, तर ग्रेडिंगमुळे किंमत आणि बाजार निश्‍चित होतो.

CropGrading
Farm Produce Grading : शेतीमाल प्रतवारी करण्यासाठी यंत्रांची आवश्यकता

वर्गीकरण (Sorting) : वर्गीकरण म्हणजे उत्पादनांना त्यांच्या गुणधर्मांनुसार, जसे की त्यांचे रंग, आकार, वजन, पोत, पिकण्याची स्थिती, बाह्य स्वरूप इत्यादी निकषांवर वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणे. उदा. टोमॅटो आकारावरून लहान, मध्यम आणि मोठे असे वर्गीकृत केले जातात. यामुळे समान वैशिष्ट्ये असलेल्या शेतीमालाची एकत्रित विक्री करता येते.

प्रतवारी (Grading) : प्रतवारी म्हणजे उत्पादनांना त्यांचा दर्जा (Quality) आणि गुणवत्तेनुसार उच्च, मध्यम आणि निम्न अशा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागली जातात. उदा. आंबा त्याच्या रंग, चव आणि आकारावरून अ, ब आणि क श्रेणींमध्ये विभागला जातो.प्रतवारी करताना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय मानके वापरली जातात.निश्‍चित / अनिवार्य प्रतवारी : ही प्रतवारी ठरावीक मानकांनुसार होते, जी वेळ आणि जागेनुसार बदलत नाही. उदा. निर्यातीसाठी भारत सरकारचे मानक वापरणे अनिवार्य आहे. परवानगीयोग्य प्रतवारी : यामध्ये मानके वेळानुसार बदलतात. भारतात ही पद्धत वापरली जात नाही.

प्रतवारीचे आणखी दोन प्रकार आहेत.

केंद्रीकृत प्रतवारी : प्रयोगशाळेत विस्तृत चाचण्या करून प्रतवारी केली जाते. उदा. तूप, लोणी, मसाले.विकेंद्रीकृत प्रतवारी : यामध्ये साध्या चाचण्या वापरल्या जातात. उदा. ताजी फळे, भाज्या, धान्य.यामध्ये आकार, रंग, दोष, ओलावा इत्यादी निकषांवर प्रतवारी होते. उत्पादक स्तरावर प्रतवारी : शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी ही सेवा दिली जाते.

वर्गीकरण आणि प्रतवारीचे फायदे

गुणवत्ता सुधारणा : एकसारख्या गुणवत्तेची उत्पादने मिळतात.विक्री सुलभता ः वेगवेगळ्या प्रकारच्या फळे आणि भाज्यांची प्रतवारी केल्यास विक्री करणे सोपे जाते.उत्तम बाजारभाव : उत्पादनाला योग्य भाव मिळतो. साठवणुकीचा कालावधी वाढतो : उत्पादने अधिक काळ टिकण्यास मदत होते.वाहतुकीसाठी सुलभता : एकसारखी उत्पादने एकत्र केल्यास पॅकिंग व वाहतूक अधिक चांगल्या प्रकारे करता येते.

कचरा कमी होतो : खराब उत्पादने सुरुवातीलाच वेगळी केल्यामुळे कचरा कमी होतो आणि त्याची विल्हेवाट सोपी होते. ग्राहक समाधान : ग्राहकांना चांगली गुणवत्तेची उत्पादने मिळतात.निर्यात क्षमता वाढते : उच्च गुणवत्तेची उत्पादने निर्यात करता येतात.प्रक्रिया उद्योगासाठी सोईस्कर : विशिष्ट प्रकारच्या भाज्या / फळे प्रक्रिया (उदा. जॅम, सॉस, लोणचे) उद्योगासाठी निवडता येतात.बाजारपेठेतील स्पर्धेत टिकाव : दर्जेदार माल बाजारात टिकतो. त्यावर त्याचे ब्रॅण्डमध्ये रूपांतर होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com