Agriculture Sowing : गडहिंग्लजला पेरणीसाठी घरगुती बियाण्यांनाच प्राधान्य

Domestic Seeds : तालुक्यातील बहुतांश शेतकरी घरच्या बियाण्यांना पसंती देत असल्याचे चित्र आहे.
Soybean And Paddy
Soybean And PaddyAgrowon

Kolhapur News : तालुक्यातील बहुतांश शेतकरी घरच्या बियाण्यांना पसंती देत असल्याचे चित्र आहे. यंदा सोयाबीन व भाताचे घरातीलच ८०० टन बियाणे वापरण्यात येणार असून या घरच्या बियाण्यांतून आता नवे अंकुर फुटणार आहेत.

खरीप हंगामाचे वेध लागताच शेतकऱ्यांमध्ये शेती मशागत पूर्ण करण्यासह बियाणे, खते, कीटकनाशके उपलब्ध करण्यात धडपड पाहायला मिळते. तालुक्यात खरिपामध्ये भात, सोयाबीन पिके प्राधान्याने, तर भुईमूग, ज्वारी, मका, नाचणीसह कडधान्ये व तृणधान्ये कमी प्रमाणात घेतली जातात.

Soybean And Paddy
Paddy Plantation : भात साठ हजार हेक्टरवर लावणार

सोयाबीन १२ हजार २००, तर भाताची ८ हजार ८९० हेक्टरवर यंदा लागवड होणार आहे. शेकडो कंपन्यांचे बियाणे सध्या बाजारात उपलब्ध असून खरेदीसाठी गर्दीही होत आहे. खतांचा साठाही मुबलक प्रमाणात आहे. अलीकडील काही वर्षांपासून सोयाबीन व भात बियाण्यांची दरवाढ होत आहे. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही. यावर्षी दहा टक्क्यांनी दर वाढल्याचे सांगण्यात येते.

या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागातर्फे घरातील सोयाबीन व भाताचे बियाणे वापरण्याचे आवाहन केले जाते. सोयाबीन बियाणे सलग दोन वर्षे वापरले तरी चांगले उत्पादन मिळवून देते. बियाण्यांची झालेली दरवाढ व कृषी खात्याने केलेल्या प्रबोधनानुसार अलीकडील काही वर्षांपासून शेतकरी घरचे सोयाबीन पेरणीसाठी वापरण्यास प्राधान्य देत आहेत.

Soybean And Paddy
Soybean Seed : सोयाबीन बियाण्याची महागाई, हमीचा अभाव

यंदा हे प्रमाण सोयाबीनमध्ये ७५, तर भातामध्ये ४० टक्क्यांवर पोहोचले आहे. सोयाबीन हेक्टरी ७०, तर भात बियाणे ४५ किलो लागतात. यावर्षी घरचे सोयाबीन बियाणे वापरण्याचे प्रमाण ७५ टक्के, तर भाताचे ४० टक्क्यापर्यंत आहे. यामुळे बाजारात विक्रीसाठी सोयाबीनचे २ हजार २३ क्विंटल, तर भात २ हजार २२ क्विंटल बियाण्यांची मागणी केली असून बियाण्यांचा साठा मुबलक असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

दृष्टिक्षेपात घरगुती बियाणे

सोयाबीन लागवड : १२ हजार २०० हेक्टर

* घरगुती बियाण्यांचा वापर : ६४० टन (एकूण बियाण्यांच्या ७५ टक्के)

भाताची लागवड : ८ हजार ८९० हेक्टर

* घरगुती बियाणे : १६० टन (एकूण बियाण्यांच्या ४० टक्के)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com