Shiromani Sugar Mill : ‘सहकार शिरोमणी’कडे शेतकऱ्यांना देण्यासाठी ६५ कोटी नाहीत का?

कारखाना माझी किंवा कोणाचीच वैयक्तिक प्रॉपर्टी नाही, ती सभासदांची आहे, ती तशीच राहावी, यासाठीच कारखान्याच्या निवडणुकीसाठी आपण विचार करत आहोत.
Sugar Mill
Sugar MillAgrowon

Solapur News : सहकार शिरोमणी साखर कारखान्याला (Cooperative Shiromani Sugar Factory) १२० कोटी रुपयांचे उत्पन्न झाले. पण शेतकऱ्यांचे ६५ कोटी रुपये द्यायला कारखान्याकडे पैसे नाहीत, हे कसे काय, असा प्रश्न विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी केला.

सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया लवकरच होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विचारविनिमयासाठी पाटील यांनी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, नामदेव ताड, इस्माईल मुलाणी, नंदकुमार बागल, रायप्पा हळणवर, भास्कर मोरे, दीपक भोसले, संजय घोडके आदी या वेळी उपस्थित होते.

Sugar Mill
Malegaon Sugar Mill : माळेगाव देणार साखर कामगारांना वेतन वाढीतला फरक

श्री. पाटील म्हणाले, की कारखाना माझी किंवा कोणाचीच वैयक्तिक प्रॉपर्टी नाही, ती सभासदांची आहे, ती तशीच राहावी, यासाठीच कारखान्याच्या निवडणुकीसाठी आपण विचार करत आहोत.

सहकार शिरोमणी कारखान्याला ४२६ कोटी रुपयांचे कर्ज व इतर देणी आहेत. हे आव्हानच आहे. पण हे आव्हान आपण पेलू, पण आपल्या सर्वांच्या पाठबळावरच ते शक्य आहे.

कारखान्याचे १० हजार ८०० सभासदांना दोन-दोन शेअर दिले. मी सभासद असताना माझे नाव कमी केले. वाहनमालक होतो, ऊस घालवला होता, तरी माझे नाव मतदार यादीतून घालवले, आता हरकती घेण्याची मुदत आहे, त्या वेळी आपण हा विषय मांडू, असेही ते म्हणाले.

प्राचार्य डॉ. रोंगे यांनीही मी गतवेळच्या निवडणुकीत पॅनेल उभा केला म्हणून, माझा ऊस घेतला नाही, साखर आयुक्तांपर्यंत मला तक्रारी कराव्या लागल्या, असे सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com