Warehouse Service Provider : गोदाम सेवा पुरवठादार म्हणून नोंदणीसाठी आवश्‍यक कागदपत्रे

Agriculture Warehouse : वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व गोदामांना रेपॉजिटरी सिस्टिममध्ये प्रवेश देण्यात येतो. यासाठी आवश्यक प्रक्रिया आणि शुल्क याबाबत ‘एनईआरएल’च्या संकेतस्थळावर भेट देऊन माहिती घ्यावी.
Warehouse
WarehouseAgrowon

मिलिंद आकरे, हेमंत जगताप

Agriculture Warehouse Business : पुढील पाच वर्षांत विविध प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकरी कंपन्या, सहकारी संस्था व महिला बचत गटांचे फेडरेशन यांची सुमारे ५,००० हून अधिक प्रमाणित गोदामांची उभारणी होणार आहे. या गोदामांच्या माध्यमातून गोदाम हीच बाजारपेठ निर्माण होणार आहे. यासाठी नॅशनल ई-रिपोजिटरी लिमिटेडकडे गोदाम सेवा पुरवठादार म्हणून नोंदणीसाठी आवश्‍यक कागदपत्रे जमा करणे आवश्‍यक आहे.

अ) एनईआरएलमध्ये खाते उघडणे : वैयक्तिक

रिपॉझिटरी खाते पुढीलप्रमाणे क्लायंट श्रेणींसाठी वैयक्तिक श्रेणीमध्ये उघडले जाईल :

१)शेतकरी, २) वैयक्तिक, ३) प्रोप्रायटरी

वैयक्तिक आणि शेतकरी

वैयक्तिक/शेतकऱ्यांच्या नावाने खाते उघडणे आवश्यक आहे.

खाते उघडण्यासाठी व्यक्तीची पॅन कार्ड प्रत अनिवार्य आहे.

शेतकऱ्याला पॅन कार्ड प्रत नसताना ७/१२ उतारा आणि वैध ओळखीचा पुरावा स्वाक्षरी आणि छायाचित्र पडताळणीकरिता जमा करणे आवश्यक आहे.

खाते उघडण्यासाठी व्यक्तीने पत्त्याचा वैध पुरावा सादर केला पाहिजे, याची यादी पत्त्याचा पुरावा (POA) म्हणून स्वीकारलेली कागदपत्रे नमूद केली आहेत (वरीलप्रमाणे पत्त्याचा पुरावा

खाते उघडण्यासाठी व्यक्तीने ओळखीचा वैध पुरावा सादर करणे आवश्यक आहे, त्यांची यादी ओळखीचा पुरावा (POI) म्हणून स्वीकारलेले दस्तऐवज नमूद केले आहेत (वरीलप्रमाणे ओळखीचा पुरावा (POI))

कागदपत्रे व्यक्तीने प्रमाणित केलेली असावीत.

Warehouse
Warehouse Service Provider : गोदाम सेवा पुरवठादार होण्यासाठी संधी

ब) ‘एनईआरएल’मध्ये खाते उघडणे : संस्थात्मक

रिपॉझिटरी खाते खालील प्रकारच्या श्रेणींसाठी वैयक्तिक नसलेल्या किंवा संस्थात्मक श्रेणीमध्ये उघडता येते.

संघटना, बँक, केंद्र सरकारची संस्था,  राज्य सरकारची संस्था, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था,  शेतकरी उत्पादक संस्था किंवा कंपनी, प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था किंवा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, भागीदारी फर्म  कलम २५ अन्वये तयार झालेली कंपनी (ना-नफा संस्था), बचत गट, इतर (वरील

श्रेणींमध्ये उल्लेख नसलेल्या संस्था)संस्थात्मक श्रेणींसाठी उपरोक्त ओळखीचा पुरावा (POI) पत्त्याचा पुरावा (POA) व्यतिरिक्त इतर कागदपत्रांची

Warehouse
Agriculture Warehouses : गोदामामध्ये शेतीमाल साठवण सुविधा

आवश्यकता :

खाते संस्थेच्या/ फर्मच्या नावाने उघडायचे आहे.

कॉर्पोरेट खाते उघडण्यासाठी कंपनीच्या नावाने पॅन क्रमांक अनिवार्य आहे.

कॉर्पोरेट खाते उघडण्यासाठी

कंपनीच्या नावाचा पत्ता व पुरावा अनिवार्य आहे.

जीएसटी प्रमाणपत्र अनिवार्य आहे. जीएसटी प्रमाणपत्रावरील पत्ता नमूद केल्याप्रमाणे असावा. उलाढाल २० लाखांपेक्षा कमी असल्यास आणि जीएसटी प्रमाणपत्र नसल्यास तसे घोषणापत्र सादर करावे. खाते उघडण्याच्या अर्जात तसे नमूद करणे आवश्यक आहे.

मागील दोन आर्थिक वर्षाच्या ताळेबंदाची प्रत आवश्यक (दरवर्षी जमा करणे अपेक्षित).

कंपनी सचिव/संपूर्ण वेळ संचालक/एमडी यांच्या मार्फत प्रमाणित कंपनीच्या ताज्या शेअर होल्डिंग पॅटर्नची सर्व यादीसह प्रत (दरवर्षी सादर केले जाणे अपेक्षित).

संपूर्ण वेळ दैनंदिन कामकाजाचे प्रभारी संचालक/दोन संचालक यांचे छायाचित्र, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, पॅन आणि डीन क्रमांक.

प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नियंत्रण असलेल्या वैयक्तिक प्रवर्तकांचा पॅन, फोटो, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा.

मेमोरँडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनच्या प्रति आवश्यक.

नोंदणी प्रमाणपत्राची प्रत आवश्यक.

कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बोर्डाच्या ठरावाची प्रत आवश्यक.

फोटो आणि स्वाक्षरीसह

अधिकृत स्वाक्षरीचा तपशील आवश्यक.

कंपनीच्या वतीने कमोडिटीजमध्ये व्यवहार करण्यासाठी कंपनीच्या मुद्रांकासह पूर्णवेळ संचालक व अधिकृत व्यक्तीची नेमणूक आवश्यक. याव्यतिरिक्त तपशीलासाठी ‘एनईआरएल’च्या संकेतस्थळावरून हेल्पडेस्कला संपर्क साधू शकता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com