Mahesh Gaikwad
पीएम किसान योजनेच्या १६ व्या हप्त्यासंदर्भातील बातमी समोर आली असून यामुळे राज्यासह देशातील करोडो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
पीएम किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम कधी जमा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. आता या संदर्भातील तारिख जाहीर झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरातीस करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात १५ हप्त्यांमध्ये दोन हजारप्रमाणे रक्कम जमा करण्यात आली आहे.
होळीसणापूर्वी देशातील जवळपास आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात योजनेच्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते २८ फेब्रूवारीला २०२४ रोजी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
यवतमाळ येथील कार्यक्रमातून मोदींच्या हस्ते योजनेचा १६ व्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे.
डीबीटीच्या माध्यमातून योजनेची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. १६ व्या हप्त्याबाबत पीएम किसान योजनेच्या अधिकृत हँडलवरून पोस्ट करण्यात आली आहे.