Agriculture workshop : पारंपरिक शेतीसोबत पूरक व्यवसाय करा : ढगे

Manojkumar Dhage : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक शेती करताना फळबाग लागवड, रेशीम उद्योग, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालनसारखे पूरक व्यवसाय करावेत,
Manojkumar Dhage
Manojkumar DhageAgrowon

Buldhana News : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक शेती करताना फळबाग लागवड, रेशीम उद्योग, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालनसारखे पूरक व्यवसाय करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले.

आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने कृषी खात्यामार्फत जिल्हाभर गावोगावी सोयाबीन बियाणे उपलब्धता, उगवणशक्ती तपासणी, बीजप्रक्रिया, खत नियोजन व इतर पिकांची माहिती देण्यासाठी सभांचे आयोजन केले जात आहे. मेहकर तालुक्यातील मुंदेफळ येथे झालेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

Manojkumar Dhage
Pre-Monsoon Rain : पुणे जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस सुरूच

या खरीप हंगाम नियोजन सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंचपदी गोपाल चांदणे होते. मेहकर उपविभागीय कृषी अधिकारी किशोर काळे, कृषी पर्यवेक्षक विठ्ठल धांडे हे उपस्थित होते. श्री. ढगे पुढे म्हणाले, ‘‘शासनाच्या योजना व इतर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी गावोगावी शेतकऱ्यांचे व्हॉटसॲप ग्रुप करून त्यात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.

Manojkumar Dhage
Agrowon Sanvad : केळी उत्पादकाने निर्यातक्षम पीक घ्यावे

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा.’’कृषी पर्यवेक्षक श्री. धांडे यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे सुधारीत लागवड तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. बियाणे बदल, वाणाची निवड, घरच्याघरी उगवण क्षमता तपासणी, बीजप्रक्रिया, खत व्यवस्थापन, बीबीएफ, पट्टा पद्धत व गादी वाफ्यावर सोयाबीन लागवडीविषयी मार्गदर्शन केले. बियाणे उगवणशक्ती व बिजप्रक्रीयेचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

किशोर काळे यांनी तूर पिकाविषयी माहिती दिली. मर रोग, वाणाची निवड, खत व्यवस्थापन सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिवरा खुर्द कृषी सहायक रामकृष्ण झोरे यांनी केले. बाबूराव लाड यांनी आभार मानले. या वेळी जानेफळ कृषी पर्यवेक्षक विनोद मोरे, दिलीप वायाळ, कृषी सहाय्यक पंढरी अंभोरे, विलास काळे, श्री. पऱ्हाड, डी. एल. देशमुख, सीमा अंभोरे, विद्या गुंजकर व कु.लाकडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com