Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon

Animal Husbandry : पुण्यातील विभागीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा अहमदनगरला स्थलांतरीत

पुणे व राज्यस्तरीय आणि विभागीय या दोन्ही रोग अन्वेषण प्रयोगशाळा आणि विभागासाठी एकच इमारत आहेत. त्यामुळे कामाचं विकेंद्रीकरण होत नाही. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात प्रयोगशाळा स्थलांतरीत करण्यात आल्याचं शासन निर्णयात सांगितलं आहे.
Published on

पुणे विभागात कार्यरत विभागीय अन्वेषण प्रयोगशाळा अहमदनगर विभागात स्थलांतरीत करण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने सोमवारी (ता.१९) प्रसिद्ध केला. नाशिक विभागातील जिल्ह्यांमध्ये पशुधन संख्या सर्वाधिक असल्याने पुणे येथील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाला अहमदनगर येथे स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचं शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यासाठी राज्य सरकारने काही अटी घालून दिल्या आहेत.

Animal Husbandry
Marathwada Dairy Project : विदर्भ- मराठवाड्यातील दुग्धविकास प्रकल्पांसाठी १४९ कोटींच्या निधीला मान्यता

या प्रयोगशाळेसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाच्या आवारात इमारत उपलब्ध करून देण्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. पुणे येथील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळाच्या आस्थापनेवर श्वानप्रतिबंधक पथकासाठी पशुधन विकास आधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक या वर्गातील प्रत्येकी १ पद वगळून उर्वरित पदांसह विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा स्थलांरित करण्यात येणार आहे. तर श्वानप्रतिबंधक पथक राज्यस्तरीय रोग अन्वेषण विभाग पुणे यांच्या अधिनस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात पशुधनापासून जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं, यातही पशुधनाच्या आजाराचं योग्य वेळी निदान होऊन उपचार करणं गरजेचं असतं. तयासाठी राज्यात रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ८ विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा आहेत. त्यापैकी पुणे आणि कोल्हापूर विभागात २ प्रयोगशाळा आहेत. तर उर्वरित ६ प्रयोगशाळा नाशिक, छत्रपती संभाजी नगर, लातूर, अकोला, नागपूर, चिपळूण येथे सुरू आहेत.

पुणे विभागात २ विभागीय प्रयोगशाळांसह राजस्तरीय रोग अन्वेषण विभाग आहे. तसेच एकूण ३ रोगनिदान प्रयोगशाळा आहेत. पुणे व राज्यस्तरीय आणि विभागीय या दोन्ही रोग अन्वेषण प्रयोगशाळा आणि विभागासाठी एकच इमारत आहेत. त्यामुळे कामाचं विकेंद्रीकरण होत नाही. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात प्रयोगशाळा स्थलांतरित करण्यात आल्याचं शासन निर्णयात सांगितलं आहे.

अहमदनगर जिल्ह्यात १८ लाख ४१ हजार ७७५ पशुधनाची संख्या आहे. मागील तीन वर्षात पशुधनाच्या रोग नमुन्यांची तपासणी संख्या जास्त आहे. त्यामुळं अहमदनगर जिल्ह्यात पशुधनास तात्काळ रोग निदान उपलब्ध व्हावं, असाही स्थलांतरामागे उद्देश असल्याचं राज्य सरकारने शासन निर्णयात स्पष्ट केलं आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com