Bujal Award : ‘भूजल’ स्पर्धेत काऱ्हाटीला जिल्हास्तरीय पहिला पुरस्कार

Water Competition : अटल भूजल योजना, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत राबविलेल्या ‘भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा- २०२२-२३’चे निकाल जाहीर झाले आहेत.
Bhujal Award
Bhujal AwardAgrowon

Pune News : अटल भूजल योजना, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत राबविलेल्या ‘भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा- २०२२-२३’चे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये जिल्हास्तरावर काऱ्हाटी (ता. बारामती) या गावाने प्रथम पुरस्कार, तर सोनोरी आणि चांबळी (ता. पुरंदर) या गावांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत घसरण होत आहे. ती थांबविण्यासाठी केंद्र शासन व जागतिक बँक अर्थसाह्यित ‘अटल भूजल योजना’ १३ जिल्ह्यांतील ४३ तालुक्यांतील १ हजार १३३ ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येत आहे.

Bhujal Award
Bhujal Yojana : कोरडवाहू उत्पादनवाढीसाठी ७ हजार हेक्टरवर पथदर्शी प्रकल्प

या स्पर्धेतील उत्कृष्ट लोकसहभाग नोंदविणाऱ्या आणि काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना २०२२-२३ आणि २०२३-२४ या दोन आर्थिक वर्षांसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. ग्रामस्तरावर जल अंदाजपत्रक तयार करण्यासह भूजल उपलब्धतेतील तूट भरून काढण्यासाठी अस्तित्वातील राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे अधिकाधिक अभिसरण करणे व ग्रामस्तरावरील भूजल उपलब्धतेत शाश्‍वतता साध्य करणे आदी या योजनेची उद्दिष्टे आहेत.

Bhujal Award
Bhujal Recharging : भूजल वाढविण्यासाठीच्या उपाययोजना

या स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम क्रमांकास १ कोटी रुपये, द्वितीय क्रमांकास ५० लाख रुपये, तर तृतीय क्रमांकास ३० लाख रुपये बक्षीस आणि जिल्हास्तरीय प्रथम क्रमाकांस ५० लाख, द्वितीय क्रमांकास ३० लाख, तर तृतीय क्रमाकांस २० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.

तीस ग्रामपंचायतींचा सहभाग

‘‘२०२२ -२३ मध्ये जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील २२ ग्रामपंचायती आणि बारामती तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींनी स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्यांची एकूण ५५९ गुणांसाठी स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे मूल्यांकन उपविभाग स्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावर करण्यात आले. त्यानुसार या स्पर्धेचा निकाल पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव यांनी जाहीर केला,’’ अशी माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर धोटे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com