Ajit Pawar : पुणे जिल्ह्यातील १७ उत्कृष्ट सहकारी संस्थांना ढाली

जिल्हा बॅंकेतर्फे संचालक अजित पवार यांच्या हस्ते गौरव
Ajit Pawar
Ajit Pawar Agrowon
Published on
Updated on

पुणे : पुणे जिल्हा बॅंकेची (Pune District Bank) १०५ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. ३०) पुण्यातील अल्पबचत भवन येथे घेण्यात आली. या वेळी २०२१-२२ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या सहकारी संस्थांना (Pune Co-operative Socirty) जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर कायमरूपी ढाल देऊन गौरविण्यात आले.

Ajit Pawar
PDCC Bank Pune : ‘पीडीसीसी’ बँकेला ६८ कोटींचा नफा

यामध्ये जिल्हा स्तरावरील शेती संस्था वर्गातील हवेली येथील बागायत गटातील तीन संस्था व तालुका स्तरावरील १३ व बिगरशेती सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचा बॅंकेचे संचालक अजित पवार यांच्या हस्ते ढाल देऊन गौरव करण्यात आला.

Ajit Pawar
Ajit Pawar : पशुधनावरील गंभीर धोका दूर करा ः अजित पवार

या वेळी बॅंकेचे चेअरमन प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक दिलीप वळसे पाटील, दत्तात्रेय भरणे, अॅड अशोक पवार, दिलीप मोहिते, संजय जगताप, रमेश थोरात, रेवणनाथ दारवटकर, ज्ञानोबा दाभाडे, अॅड. संजय काळे, अप्पासाहेब जगदाळे, प्रदीप कंद, पूजा बुट्टे-पाटील, निर्मला जागडे, संभाजी होळकर, प्रवीण शिंदे, विकास दांगट आदी उपस्थित होते.

उत्कृष्ट काम केलेल्या संस्थांची नावे

जिल्हा स्तरावर : शेती संस्था

गट --- तालुका --- शाखा --- विविध कार्यकारी सेवा संस्थेचे नाव

बागायत -- हवेली --- देहू रोड ---किवळे रावेत

जिरायत --- खेड --- वाफगाव --- वरुडे

डोंगराळ --- मुळशी --- पौंड --- अंबटवेट

तालुका स्तरावर :

तालुका --- शाखा --- विविध कार्यकारी सेवा संस्थेचे नाव

आंबेगाव -- घोडेगाव -- घोडेगाव

बारामती -- सांगवी -- श्री लक्ष्मी, सांगवी

भोर -- कापूरहोळ -- श्रीराम, निगडे

दौंड -- राजेगाव -- भैरवनाथ, वाटलूज

हवेली -- लोणी काळभोर -- श्री. काळभैरवनाथ, लोणी काळभोर

इंदापूर -- वरकुटे बु. --- विठाबाई, गंगावळण

जुन्नर -- मा. क. जुन्नर --- निरगुडे

खेड -- बहुळ -- मोहितेवाडी

मावळ -- कामशेत -- चिखलसे

मुळशी -- माले -- वाघजाई, चांदवली - माले

पुरंदर -- नायगाव -- शेंडकर पिंपरी

शिरूर -- वडगाव रासाई -- श्रीरामजी, वडगाव रासाई

वेल्हा -- पानशेत -- ओसाडे निगडे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com